मराठा-कुणबी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

। लोकजागर । सातारा। दि. 9 जून 2025 ।

मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या जातीतील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे यांच्यामार्फत शिष्यवृत्ती दिली जाते. विद्यार्थ्यांनी अर्ज 16 जून पर्यंत ऑनलाईन सादर करावेत, असे आवाहन व्यवस्थापकीय संचालक यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी सारथीच्या विभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा 020-25592507 या दूरध्वनी क्रमांकवर संपर्क साधावा.

Spread the love