फलटणच्या श्रीराम बझारमध्ये ‘भव्य गहू महोत्सवाचे’ आयोजन; दर्जेदार गव्हाच्या खरेदीवर मिळणार २१ आकर्षक गालिचे

लोकवन, शरबती, सिहोर आणि खपली गव्हाच्या विविध जाती विक्रीसाठी सज्ज; ३१ मे पर्यंत चालणाऱ्या महोत्सवात ग्राहकांना मिळणार बक्षिसांची संधी.

। लोकजागर । फलटण । ०१ एप्रिल २०२६ ।

गेली ३८ वर्षे ग्राहकांना स्वच्छ आणि निवडक माल किफायतशीर दराने पुरविणाऱ्या फलटण येथील नामांकित ‘श्रीराम बझार’मध्ये १ एप्रिल ते ३१ मे २०२६ या कालावधीत भव्य गहू महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवामध्ये ग्राहकांना उच्च दर्जाचा गहू खरेदी करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली असून, गव्हाच्या विविध जाती एकाच छताखाली उपलब्ध असल्याची माहिती सरव्यवस्थापक अनंत पाटील यांनी दिली आहे.

या महोत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे येथे लोकवन, शरबती, सिहोर आणि खपली यांसारख्या गव्हाच्या लोकप्रिय जाती विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. विशेष म्हणजे, ३० किलो किंवा त्या पटीत गहू खरेदी करणाऱ्या भाग्यवान ग्राहकांसाठी बक्षिसांची योजना आखण्यात आली आहे. या ग्राहकांमधून निवडल्या जाणाऱ्या २१ विजेत्यांना आकर्षक गालिचे बक्षीस म्हणून दिले जाणार आहेत. या योजनेसाठीच्या कुपन्सची सोडत १४ जून २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता श्रीराम बझारचे मुख्य कार्यालय आणि सर्व शाखांमध्ये एकाच वेळी काढण्यात येणार आहे.

असंख्य ग्राहकांचा विश्वास संपादन केलेल्या श्रीराम बझारच्या या उपक्रमाला फलटणकर नागरिकांनी आणि ग्राहकांनी उदंड प्रतिसाद द्यावा, अशी अपेक्षा संचालक मंडळाच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे. घरगुती वापरासाठी वर्षाचा गहू साठवून ठेवणाऱ्या ग्राहकांसाठी हा महोत्सव एक पर्वणीच ठरणार आहे.

Spread the love