। लोकजागर । सातारा ।
अमृत लक्ष्यित गटातील उमेदवारांसाठी निशुल्क मोफत विविध तांत्रिक व उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अमृत पुणे व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, सातारा .यांच्या वतीने अमृत योजनेअंतर्गत खुल्या प्रवर्गातील अमृत लक्षित गटातील उमेदवारासाठी निशुल्क मोफत विविध तांत्रिक विषयावर आधारित 18 दिवसीय निवासी तांत्रिक उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम होणार आहे. या प्रशिक्षणाचा इच्छुक उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राकडून करण्यात आले आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमात शिबिरात सोलार पॅनल इंस्टॉलेशन वर आधारित निवासी तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम १४ ते ३१ जानेवारी २०२५ व बेकरी प्रशिक्षण कार्यक्रम 21 जानेवारी 2025 या कालावधीत तर आयात व निर्यात प्रशिक्षण कार्यक्रम 13 जानेवारी ते 30 जानेवारी 2025 या तीनही प्रशिक्षण कार्यक्रम 18 दिवसांच्या कालावधीमध्ये सुशिक्षित बेरोजगार युवकांना तांत्रिक उद्योजकता प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणार्थिची निवड प्रत्यक्षपणे मुलाखतीद्वारे होणार आहे.
कोणाला मिळणार प्रशिक्षणासाठी प्रवेश – प्रवेशासाठी पात्रता शिक्षण किमान बारावी पास पदवीधर व तांत्रिक पदवीधारकास प्राधान्य असून वयोमर्यादा 21 ते 50 वर्ष आहे. सातारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील उमेदवारांना प्रशिक्षणामध्ये सहभागी होण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.
महाराष्ट्र उद्योजक्ता विकास केंद्र द्वारा जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे, हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत आहे. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची झेरॉक्स जोडून जिल्हा प्रकल्प समन्वयक, जिल्हा उद्योग केंद्र ,जुनी एमआयडीसी, सातारा येथे देणे आवश्यक आहे.