लक्ष्मीबाई गावडे सवई यांचे निधन

। लोकजागर । गोखळी । दि. १७ मार्च २०२५ ।

फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ज्ञानदेव बापू गावडे ( सवई) यांच्या मातोश्री, फलटण पंचायत समितीचे माजी सदस्य स्वर्गीय बाबासो रामभाऊ गावडे (सवई) यांच्या पत्नी, जेष्ठ व्यक्तिमत्व श्रीमती लक्ष्मीबाई बाबासो गावडे (सवई) (वय ९६) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात एक विवाहित मुलगा, तीन विवाहित मुली, सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे .

त्यांना ताई नावाने संबोधले जात. पती स्वर्गीय बाबासाहेब गावडे यांच्या राजकीय प्रवासात अनेक चढउतार आले पण खचून न जाता खंबीरपणे त्यांना त्यांनी साथ दिली.

घरापासून निघालेल्या अंत्ययात्रेमध्ये फलटण, बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, वैद्यकीय क्षेत्रातील विविध संस्थांचे अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते. गोखळी येथील स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Spread the love