युवासेनेच्या तालुकाध्यक्षपदी सुभाषदादा पवार

। लोकजागर । फलटण । दि. 4 जून 2025 ।

शिवसेनेच्या युवा सेना फलटण तालुका अध्यक्षपदी सुभाषदादा पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कराड येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पवार यांना या निवडीचे नियुक्तीपत्र सातारा जिल्हा पालकमंत्री व पर्यटन, माजी सैनिक कल्याण मंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या हस्ते नियुक्त पत्र देण्यात आले.

यावेळी सातारा जिल्हा संपर्कप्रमुख शरद कणसे, राष्ट्रीय एसटी कर्मचारी सेना सातारा जिल्हाध्यक्ष रणजितसिंह भोसले, जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, सह संपर्कप्रमुख तुकाराम ओंबळे, फलटण तालुका अध्यक्ष नानासाहेब उर्फ पिंटूशेठ ईवरे यांची उपस्थिती होती.

फलटण तालुक्यामध्ये गाव तिथे शिवसेनेची शाखा व घर तिथे शिवसैनिक उभारण्यासाठी कार्यरत राहणार असून फलटण तालुक्यामध्ये शिवसेनेचे विचार घरोघरी पोहोचवण्याचे काम करत राहणार असून जी पक्षाने जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी पूर्ण पार पडण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सुभाषदादा पवार यांनी यावेळी बोलताना सांगितले.

त्यांच्या निवडीबद्दल फलटण तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदन चा वर्षाव होत आहे.

Spread the love