त्रिपुरी पौर्णिमेच्या निमित्ताने निघणाऱ्या या सोहळ्याची जय्यत तयारी पूर्ण
। लोकजागर वृत्त । फलटण । १२ नोव्हेंबर २०२६ ।
श्री स्वामी समर्थ भक्तांना कळविण्यात अत्यंत आनंद होतो की, श्री स्वामी समर्थांच्या परमकृपेने व स्वामी भक्तांच्या सक्रिय सहकार्याने श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ, फलटणचा ‘पायी पालखी सोहळा’ यंदा आपल्या ८ व्या वर्षात यशस्वी पदार्पण करीत आहे. श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ, फलटणतर्फे त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त सालाबादप्रमाणे या वर्षीही शुक्रवार, दिनांक १३.११.२०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ, अहिल्यानगर, गजानन चौक, फलटण येथून भव्य मिरवणुकीने व सर्व स्वामी भक्तांच्या उपस्थितीत पालखीचे व रथ सोहळ्याचे अक्कलकोटसाठी प्रस्थान होणार आहे, अशी माहिती येथील श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाचे प्रमुख संजय चोरमले यांनी दिली.
फलटण ते श्री क्षेत्र अक्कलकोट पायी वारी पालखी रथ सोहळ्याचा हा प्रवास शुक्रवार, दिनांक १३.११.२०२६ ते बुधवार, दिनांक २५.११.२०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. या सोहळ्याच्या प्रारंभी, शुक्रवार दि. १३.११.२०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता रथ व पालखी पूजनाचा कार्यक्रम पार पडून, गजानन चौक – बुधवार पेठ – श्री स्वामी समर्थ मंदिर – शंकर मार्केट – श्रीराम मंदिर – गजानन चौक – उमाजी नाईक चौक – एस.टी. स्टँड मार्गे पालखी अक्कलकोटच्या दिशेने मार्गस्थ होईल. तरी सर्व स्वामी भक्तांनी पालखी सोहळ्यात सहभागासाठी सकाळी ८.३० वाजता श्री स्वामी समर्थ मंदिरात उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.
पालखी सोहळ्यातील मुक्काम व अन्नदात्यांचे वेळापत्रक:
- शुक्रवार (१३.११.२०२६): सकाळी नाश्ता व चहा देणारे अन्नदाते – किसन भिकोबा साळुंखे व नानासो नामदेव जगदाळे; दुपारचे भोजन देणारे अन्नदाते – दत्तात्रय बापुराव बिचुकले (विडणी); रात्रीचे भोजन व मुक्कामाचे ठिकाण – महेश भिमराव बोबडे मित्र परिवार (वाजेगाव).
- शनिवार (१४.११.२०२६): सकाळी नाश्ता व चहा देणारे अन्नदाते – महेश रामचंद्र लोंढे, रामचंद्र बाबुराव लांडगे गुरुजी व संतोष विलास गावडे (राजूरी); दुपारचे भोजन देणारे अन्नदाते – विजय तुळशीराम घोरपडे आणि स्वामी समर्थ मंगल कार्यालय (धर्मपुरी); रात्रीचे भोजन व मुक्कामाचे ठिकाण – बबनराव मारुती वणवे (नातेपुते).
- रविवार (१५.११.२०२६): सकाळी नाश्ता व चहा देणारे अन्नदाते – किशोर मारुती दगडे (मांडवे फाटा), आकाश अनिल नवगंद (माळशिरस) व महेश देवानंद राजमाने; दुपारचे भोजन देणारे अन्नदाते – दत्त मंदिर (सदाशिवनगर); रात्रीचे भोजन व मुक्कामाचे ठिकाण – बाबासो जालिंदर चोरमले (साठफाटा, माळशिरस).
- सोमवार (१६.११.२०२६): सकाळी नाश्ता व चहा देणारे अन्नदाते – श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र (खुडूस); दुपारचे भोजन देणारे अन्नदाते – आनंद बाळासो जाधव (श्री स्वामी हॉटेल, पिसेवस्ती); रात्रीचे भोजन व मुक्कामाचे ठिकाण – दादासो एकनाथ जाधव (जाधववस्ती, तोंडले).
- मंगळवार (१७.११.२०२६): सकाळी नाश्ता व चहा देणारे अन्नदाते – सत्यवान औदुंबर काळे सर (वाडी किरोली) व अंकुश नामदेव डहाळे (वाखरी); दुपारचे भोजन देणारे अन्नदाते – महेश मनोहर उगले (दहिवडी, भाळवणी फाटा); रात्रीचे भोजन व मुक्कामाचे ठिकाण – राजेंद्र सुखदेव माने (पंढरपूर).
- बुधवार (१८.११.२०२६): सकाळी नाश्ता व चहा देणारे अन्नदाते – सतीश भिमराव यादव व योगेश महादेव देशमुख (पंढरपूर); दुपारचे भोजन देणारे अन्नदाते – संभाजी विनायक डूबल (आंजनसोंड, डूबलवस्ती); रात्रीचे भोजन व मुक्कामाचे ठिकाण – चिन्मय दिलीपराव घाडगे (सुस्ते).
- गुरुवार (१९.११.२०२६): सकाळी नाश्ता व चहा देणारे अन्नदाते – संत सद्गुरू बाळूमामा मंदिर (४८ फाटा, फुले चिंचोली); दुपारचे भोजन देणारे अन्नदाते – दिनकर हरिचंद्र काशिद (काशिदवाडी, वरकुटे); रात्रीचे भोजन व मुक्कामाचे ठिकाण – महेश विलास बसाटे (शेज बाभळगाव).
- शुक्रवार (२०.११.२०२६): सकाळी नाश्ता व चहा देणारे अन्नदाते – समर्थ प्रमोद लोंडे (महावितरण ऑफिस, कुरुळ); दुपारचे भोजन देणारे अन्नदाते – प्रदिप वसंतराव काटकर (कुरुळ); रात्रीचे भोजन व मुक्कामाचे ठिकाण – राजेंद्र संदिपान शिंदे (समाधान लॉन्स, कामथी).
- शनिवार (२१.११.२०२६): सकाळी नाश्ता व चहा देणारे अन्नदाते – दत्तात्रय तुकाराम पवार (कामथी); दुपारचे भोजन देणारे अन्नदाते – अमोल नागनाथ गवळी (तिन्हे); रात्रीचे भोजन व मुक्कामाचे ठिकाण – सौंदागर गणपत जाधव (बेलाटी) व आशुतोष बाबासाहेब कराळे (संस्कृती मंगल कार्यालय, बेलाटी, देगांव).
- रविवार (२२.११.२०२६): सकाळी नाश्ता व चहा देणारे अन्नदाते – विजय रामचंद्र जाधव व श्री स्वामी समर्थ मंदिर (देगांव); दुपारचे भोजन देणारे अन्नदाते – मोहनलाल गणेश परदेशी (सोलापूर); रात्रीचे भोजन व मुक्कामाचे ठिकाण – गेणसिद्ध देवस्थान मंदिर (कुंभारी).
- सोमवार (२३.११.२०२६): सकाळी नाश्ता व चहा देणारे अन्नदाते – अमोलराजे विठ्ठल निंबाळकर (लिंब चिंचोली); दुपारचे भोजन देणारे अन्नदाते – राहुल राजशेखर गडकरी (श्री स्वामी समर्थ सुत गिरणी, वळसंग); रात्रीचे भोजन व मुक्कामाचे ठिकाण – अतुल मधुकर ढाणके साहेब व आनंदराव जगन्नाथ जाधव (चेअरमन, कमलादेवी आश्रम शाळा, कान्होळी).
- मंगळवार (२४.११.२०२६): सकाळी नाश्ता व चहा देणारे अन्नदाते – मधुकर अशोक पुट्टा (तोतला फार्म); दुपारचे भोजन देणारे अन्नदाते – श्री स्वामी समर्थ वटवृक्ष देवस्थान व श्री स्वामी समर्थ समाधी मठ (अक्कलकोट); रात्रीचे भोजन व मुक्कामाचे ठिकाण – श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (अक्कलकोट).
- बुधवार (२५.११.२०२६): सकाळी नाश्ता व चहा देणारे अन्नदाते – मनिष सिताराम निंबाळकर; दुपारचे भोजन देणारे अन्नदाते – सदाशिव नारायण कांबळे (कुरुळ); दुपारनंतर फलटणकडे प्रस्थान.
पालखी सोहळ्यातील स्वामी भक्तांसाठी सक्त व महत्त्वपूर्ण सूचना:
- संपूर्ण पालखी सोहळ्यात सर्व भक्तांनी पारंपरिक पोशाख परिधान करावा.
- पालखी सोबत असताना रहदारीस अडथळा येईल असे चालू नये, तसेच काही अनुचित प्रकार घडल्यास सेवा मंडळ जबाबदार राहणार नाही.
- पालखीमध्ये विणेकर्यांच्या पुढे भक्तांनी जाऊ नये.
- पालखीच्या मुख्य उद्देशानुसार सातत्याने नामघोष करावा लागेल.
- नशापाणी, अनिती तसेच नियमावलीची शिस्त सोडून वागल्यास पालखीतून तत्काळ कमी केले जाईल, याची सर्व भक्तांनी नोंद घ्यावी.
- पालखीत सकाळी, दुपारी, संध्याकाळी आरती होईल; आरती अगोदर संध्याकाळी भजनाचा कार्यक्रम होईल, ज्यामध्ये सर्व वारीत येणाऱ्या भक्तांनी उपस्थित राहावे.
- पालखी सोहळ्यात मौल्यवान वस्तू आणू नयेत, त्या गहाळ झाल्यास श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ जबाबदार राहणार नाही.
- परिस्थितीनुसार पालखी सोहळ्यात बदल करण्याचा अधिकार सेवा मंडळाकडे राहील.
- पालखी अक्कलकोट येथे पोहोचल्यानंतर परतीची प्रवासाची जबाबदारी सेवा मंडळाची राहणार नाही.
- चहा, दुपारचे जेवण व रात्रीच्या मुक्कामाच्या ठिकाणी सर्व भक्तांनी स्वच्छता राखावी.
- आपली वळकटी व अंथरूण स्वतः बरोबर आणावे (कृपया गरजे पुरताच सामान असावे).
या सोहळ्यात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन पालखीची शोभा वाढवावी, अशी नम्र विनंती श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ, फलटणतर्फे करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी प्रथमेश चोरमले (९१७०९१८७०९), आशिष ननावरे (८२०८८४६४५९) किंवा कृष्णा ढोबळे (९३०७९३९९२९) यांच्याशी संपर्क साधावा.
