। लोकजागर वृत्त । फलटण । २८ ऑक्टोबर २०२६ ।
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा अधिकृत निकाल जाहीर झाला असून, यामध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार कौस्तुभ मुरलीधर गावडे यांनी दणदणीत विजय संपादन केला आहे. या अत्यंत चुरशीच्या लढतीत कौस्तुभ गावडे यांनी एकूण २३,११७ मते मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आणि आपला विजय निश्चित केला. त्यांच्या विरोधात उभे असलेले अपक्ष उमेदवार सचिन नवनाथ सानप यांनी १६,३४७ मते मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला.
घोषित करण्यात आलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, रिंगणात असलेल्या इतर उमेदवारांना मिळालेली मते खालीलप्रमाणे आहेत:
- दत्तात्रय अच्युतराव सावंत (राष्ट्रीय समाज पक्ष) – १२,६८७ मते
- असागावकर जयंत दिनकर (इंडियन नॅशनल काँग्रेस) – ८,९६५ मते
- बब्रुवाहन पांडुरंग रोंगे (अपक्ष) – २,१३३ मते
- खंडेराव शिवाजीराव जगदाळे (सर) (अपक्ष) – १,१२५ मते
- इकबाल चंदुलाल शेख (वंचित बहुजन आघाडी) – २२१ मते
- वैशाली विजय शिंदे (अपक्ष) – ११४ मते
- रजनीश श्रीकांत पिसे (अपक्ष) – ९५ मते
- लंगडे सुनील संभाजी (अपक्ष) – ९० मते
- फत्तेसिंह शहाजीराव पवार (अपक्ष) – ८७ मते
- प्रा. दिपाली सूर्यवंशी – जेथे (नेताजी काँग्रेस सेना) – ७८ मते
- दिलीप दादा कचरे (सर) (अपक्ष) – ४२ मते
- सुनीलभाऊ जगताप (अपक्ष) – ३६ मते
- प्रफुल्ल भीमदेव तावरे (अपक्ष) – ३५ मते
- प्रा. बाबासाहेब तुकाराम साबळे (अपक्ष) – ३५ मते
- महेश सूर्याजी साळुंखे (अपक्ष) – २५ मते
- प्रा. आर. वाय. घुटुकाडे सर (न्यू राष्ट्रीय समाज पार्टी) – २१ मते
- डॉ. अभिजित वामनराव बिचुकले (अपक्ष) – २० मते
- शिर्के राजेंद्र संपतराव (अपक्ष) – २० मते
- तानाजी मारुती नाईक (अपक्ष) – १८ मते
- सुधीर सूर्यकांत विसापुरे (अपक्ष) – १८ मते
- सदाशिव सिद्दु कांबळे (अपक्ष) – १५ मते
- राजेश कराडे (भीम सेना) – १३ मते
- आढळराव सचिन केशवराव (अपक्ष) – १३ मते
- बाळासाहेब उर्फ गंगाधर जगन्नाथ गोतारणे (अपक्ष) – १३ मते
- कपिल शंकर कोळी सर (अपक्ष) – १२ मते
- बाळू शहादेव शेलार (अपक्ष) – ११ मते
- अनिल देवदान मोहिते सर (अपक्ष) – ६ मते
- सताराम डुंडा भौरले (अपक्ष) – ४ मते
या निवडणुकीत ६५,४१६ एकूण वैध मते नोंदवली गेली असून, १२,०४७ मते बाद (Exhausted) ठरली आहेत. कौस्तुभ गावडे यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांकडून महायुती आणि भाजपच्या वतीने जोरदार जल्लोष साजरा करण्यात येत आहे.
