माजी आमदार स्व. डॉ. कृष्णचंद्र भोईटे यांच्या जयंतीनिमित्त आमदार सचिन पाटील यांच्याकडून अभिवादन

। लोकजागर । फलटण । शनिवार, दि. ७ मार्च २०२६ ।

फलटण तालुक्याच्या राजकारणातील ज्येष्ठ नेतृत्व आणि माजी आमदार स्व. डॉ. कृष्णचंद्र रघुनाथराव भोईटे यांच्या ८९ व्या जयंतीनिमित्त आज त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. यावेळी फलटण-कोरेगावचे आमदार सचिन पाटील यांच्यासह तालुक्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

अभिवादनानंतर उपस्थित मान्यवरांनी डॉ. भोईटे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. फलटणच्या विकासात आणि सामाजिक जडणघडणीत डॉ. भोईटे यांचे योगदान मोलाचे राहिले असून, त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

याप्रसंगी राजेंद्र भोईटे, ज्येष्ठ नगरसेवक अशोकराव जाधव, ॲड. नरसिंह निकम, राजाभाऊ नागटिळे, ॲड. अनिल फाळके यांसह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. डॉ. भोईटे यांच्या जयंतीनिमित्त फलटण परिसरात विविध सामाजिक उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते.

Spread the love