श्रावण मासानिमित्त आज सामूहिक मारुती स्तोत्र व रामरक्षा पठण सोहळा

फलटणच्या श्रीराम मंदिरात आयोजन; अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचा उपक्रम

। लोकजागर वृत्त । फलटण । २१ ऑगस्ट २०२६ ।

अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था व समाज सहाय्यक संस्था, नाशिक केंद्र फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने श्रावण मासानिमित्त सामूहिक मारुती स्तोत्र आणि रामरक्षा पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा धार्मिक सोहळा आज शनिवार, २२ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५ ते ६.३० या वेळेत श्रीराम मंदिर, फलटण येथे पार पडणार आहे.

या उपक्रमासाठी अविनाश भिडे (अध्यक्ष, नाशिक), अनिल देशपांडे (कार्याध्यक्ष, नाशिक), सुहास भणगे (कार्यवाह, नाशिक), चंद्रशेखर दाणी (केंद्रप्रमुख, फलटण), धनंजय विष्णुपद (कार्याध्यक्ष, फलटण), नsource/निखील केसकर (कार्यवाह, फलटण) आणि सर्व कार्यकारिणी सदस्य विशेष पुढाकार घेत आहेत.

हा सोहळा सर्वांसाठी खुला असून फलटण शहरातील नागरिक व भाविकांनी या सामूहिक पठणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Spread the love