पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत हर्षदा देशमूख-जाधव यांचा दणदणीत विजय

१ लाख १३ हजार ८४० मते मिळवून हर्षदा देशमूख-जाधव राहिल्या अव्वल

। लोकजागर वृत्त । फलटण । २८ ऑक्टोबर २०२६ ।

पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाच्या नुकत्याच पार पडलेल्या अत्यंत चुरशीच्या आणि लक्षवेधी निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार हर्षदा देशमूख-जाधव यांनी दणदणीत विजय संपादन केला आहे. या निवडणुकीत हर्षदा देशमूख-जाधव यांनी तब्बल १ लाख १३ हजार ८४० इतकी मते मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आणि राजकीय वर्तुळात आपले वर्चस्व सिद्ध केले. त्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार असलेल्या डॉ. स्मिता योगेश जाधव यांनी १ लाख ३ हजार ९१२ मते मिळवत द्वितीय क्रमांक प्राप्त केला. दोन्ही प्रमुख उमेदवारांमध्ये झालेल्या या अटीतटीच्या लढतीत अखेर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या हर्षदा देशमूख-जाधव यांनी विजय मिळवत बाजी मारली आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, या मतदारसंघात रिंगणात उतरलेल्या इतर उमेदवारांची मते आणि त्यांची क्रमवारी खालीलप्रमाणे राहिली आहे:

  • सुनील जबारचंद मोदी (शिवसेना – उद्धव बालासाहेब ठाकरे) – ३,३२९ मते (रँकिंग ३)
  • प्रा. सोमनाथ जनार्दन साळुंखे (वंचित बहुजन आघाडी) – २,७८२ मते (रँकिंग ४)
  • प्रो. नामदेवराव जाधव (सानय छत्रपती शासन) – २,०८९ मते (रँकिंग ५)
  • लक्ष्मण साहेबराव हरनावळ (अपक्ष) – १,५२७ मते (रँकिंग ६)
  • अरुणराज व्यंकट जाधव (अपक्ष) – ४३५ मते (रँकिंग ७)
  • डॉ. तोहिद रफिक अहमद मुजावर (अपक्ष) – ३३४ मते (रँकिंग ८)
  • डॉ. नाना लिंगप्पा गावडे (नवे राष्ट्रीय समाज पार्टी) – २६४ मते (रँकिंग ९)
  • बाबुसाहेब नामदेव जगताप (अपक्ष) – २५९ मते (रँकिंग १०)
  • अर्जुन गोपाळ कारपे (अपक्ष) – १७९ मते (रँकिंग ११)
  • प्रा. आनंद जेथे (नेताजी काँग्रेस सेना) – १६६ मते (रँकिंग १२)
  • दीपाली अशोक वाघमोडे (अपक्ष) – १८३ मते (रँकिंग १३)
  • डॉ. उन्मेश गणपतराव देशमुख (अपक्ष) – १५७ मते (रँकिंग १४)
  • एम. डी. देशमुख (अपक्ष) – १५२ मते (रँकिंग १५)
  • डॉ. इश्वर महादेव यमगर (भारतीय लोकशक्ती पार्टी) – १४९ मते (रँकिंग १६)
  • सुमित दशरथ शिवंकर – माली (अपक्ष) – १३८ मते (रँकिंग १७)
  • सी. ए. किशोर गजानन गुरसाळे (अपक्ष) – १२९ मते (रँकिंग १८)
  • डॉ. अभिजीत वामनराव बिचुकले (अपक्ष) – ११४ मते (रँकिंग १९)
  • आढळकर भाऊसाहेब रावसाहेब (अपक्ष) – १११ मते (रँकिंग २०)
  • राणी सुजित खुर्द (अपक्ष) – १०० मते (रँकिंग २१)
  • कासार प्रवीण धनंजय (निभय महाराष्ट्र पार्टी) – ८३ मते (रँकिंग २२)
  • गणेश विलास सावंत (अपक्ष) – ७९ मते (रँकिंग २४)
  • राजेश कराडे (भिम सेना) – ७० मते (रँकिंग २३)
  • प्रा. नथूजी दत्तात्रय चौगुले आणि प्रा. एन. डी. चौगुले (अपक्ष) – ६८ मते (रँकिंग २५)
  • जैनुद्दीन दस्तगीर शेख (अपक्ष) – ६७ मते (रँकिंग २६)
  • प्रा. डॉ. अशोक बाबुराव गायकवाड (अपक्ष) – ६७ मते (रँकिंग २७)
  • रोहित अनिल राऊत (अपक्ष) – ६३ मते (रँकिंग २८)
  • कपिल शंकर कोळी (अपक्ष) – ५० मते (रँकिंग २९)
  • गणेश शिवराम लालगुडे (अपक्ष) – ४५ मते (रँकिंग ३०)
  • महरुद्र कदजी टिकुंडे (अपक्ष) – ४१ मते (रँकिंग ३१)
  • ॲड. अमोल दामोदर लोंढे (अपक्ष) – ४१ मते (रँकिंग ३२)
  • खंदारे निखिल विलास (अपक्ष) – ३९ मते (रँकिंग ३३)
  • चिन्मय विजय नारके (अपक्ष) – ३१ मते (रँकिंग ३४)
  • रुपाली राजेंद्र बोचकेरी (भारतीय जन सम्राट पार्टी) – २६ मते (रँकिंग ३५)
  • अभिमन्यू भानुदास आथवले (अपक्ष) – २५ मते (रँकिंग ३६)
  • चंद्रकांत परमेश्वर सावंत (अपक्ष) – २३ मते (रँकिंग ३७)
  • सचिन महावीर पाटील (अपक्ष) – २३ मते (रँकिंग ३८)
  • उत्तम रंगा सकटे (अपक्ष) – २२ मते (रँकिंग ३९)
  • बनसोडे संजय मनोहर (अपक्ष) – २० मते (रँकिंग ४०)
  • निवृत्ती केरू शिंदे (अपक्ष) – १८ मते (रँकिंग ४१)
  • शिवानंद तोतप्पा बिराजदार (अपक्ष) – १६ मते (रँकिंग ४२)
  • उंबारकर रुपेश शिवाजी (अपक्ष) – १६ मते (रँकिंग ४३)
  • संजय भिकाजी मगडे (लोकराज्य जनता पार्टी) – १४ मते (रँकिंग ४४)
  • जगताप हेमंत विजय (अपक्ष) – १४ मते (रँकिंग ४५)
  • मांडवे संदीप औदुंबर (अपक्ष) – १४ मते (रँकिंग ४६)
  • कुलाळ सतीश शहाजी (अपक्ष) – १४ मते (रँकिंग ४७)

या विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि समर्थकांमध्ये प्रचंड उत्साह असून, ठीक ठिकाणी फटाके फोडून व पेढे वाटून जोरदार जल्लोष साजरा करण्यात येत आहे.

Spread the love