आंदरुड येथे श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांच्या जीवनकार्यावर व्याख्यान संपन्न

मुधोजी महाविद्यालयातील भूगोल विभागाचे सहाय्यक प्राध्यापक प्रकाश शिंदे यांचे मार्गदर्शन

। लोकजागर वृत्त । आंदरुड । २६ सप्टेंबर २०२६ ।

आंदरुड येथील आंदरुड माध्यमिक विद्यालयात श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांच्या जीवनकार्यावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणून मुधोजी महाविद्यालय फलटण येथील भूगोल विभागाचे सहाय्यक प्राध्यापक प्रकाश शिंदे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांचे सामाजिक, शैक्षणिक, सहकार चळवळीतील तसेच नीरा उजवा कालवा आणि कोयना धरण निर्मितीतील अभूतपूर्व योगदानावर सविस्तर व अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक महाडिक होते. कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन मुख्याध्यापक व सहकारी शिक्षकांनी केले होते. या कार्यक्रमासाठी बावकर रमण विजयकुमार, सुगंधा राजेंद्र साबळे, विक्रम रामचंद्र भोसले, गौरी फुलसिंग वळवी, सावंत आणि मोरे संतोष महादेव हा शिक्षक वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बावकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार साबळे यांनी मानले. या व्याख्यानाला विद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love