संत – महंतांच्या सान्निध्यात आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आशीर्वादाने नगरसेविका सिद्धाली शहा यांची अनोखी भाऊबीज

दिवाळीनिमित्त सामाजिक बांधिलकी जपत सर्वत्र घालून दिला वेगळा आदर्श

। लोकजागर वृत्त । फलटण । १२ नोव्हेंबर २०२६ ।

दीपावलीच्या पवित्र सणानिमित्त प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेत तसेच संत – महंतांच्या पावन उपस्थितीत भाऊबीज साजरी करत फलटण नगरपरिषदेच्या नगरसेविका सिद्धाली अनुप शहा यांनी समाजमनासमोर एक नवा आणि वेगळा आदर्श उभा केला आहे. जगातील सर्वात तरुण नगरसेविका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिद्धाली शहा यांनी अत्यंत आगळ्यावेगळ्या पद्धतीने हा सण साजरा केल्याबद्दल उपस्थित संत – महंतांनी त्यांचे विशेष कौतुक करत त्यांना पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी भरभरून आशीर्वाद दिले. त्यांच्या या संवेदनशील व स्तुत्य उपक्रमाची संपूर्ण शहरात सर्वत्र चर्चा होत असून, प्रभागातील नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

या दिवाळी दौऱ्यादरम्यान सिद्धाली शहा यांनी फलटण शहरातील तरुण व नागरिकांनी अत्यंत मेहनतीने आणि कलात्मकतेने साकारलेल्या विविध ऐतिहासिक किल्ल्यांच्या प्रतिकृतींना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी सर्व बाल व युवा कलाकारांचे मनापासून कौतुक करत त्यांच्या कलागुणांना मोठे प्रोत्साहन दिले. स्थानिक कलाकारांनीही नगरसेविका सिद्धाली शहा यांचे उत्स्फूर्त स्वागत करून त्यांनी साकारलेल्या ऐतिहासिक किल्ल्यांची व गडकोटांची सविस्तर माहिती त्यांना दिली. या भेटीदरम्यान त्यांनी तरुण पिढीला आणि कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आगामी वर्षात भव्य किल्ले स्पर्धा आयोजित करण्याचा आपला मानस असल्याचेही जाहीर केले.

Spread the love