20 जानेवारी रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

। लोकजागर । सातारा । दि. १७ जानेवारी २०२५

महिला लोकशाही दिन जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथील नियोजन भवनात सोमवार दि. 20 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी वि.अं. तावरे यांनी एका पत्रकान्वये दिली आहे.

 महिला लोकशाही दिनामध्ये अर्ज करणाऱ्या महिलांनी करावयाचे विहित नमुन्यातील अर्ज द्विप्रतीत करणे आवश्यक आहे. अर्जदार महिलांनी विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाच्या 15 दिवस अगोदर पाठविणे आवश्यक आहे. 

Spread the love