। लोकजागर । फलटण । दि. ०९ मार्च २०२५ ।
येथील श्रीराम एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये 8 मार्च; जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न झाला.

जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास डॉ. सौ. शर्मिला इनामके, डॉ. सौ. सुनिता खराडे, डॉ. शैलजा कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य एस. बी. थोरात होते. यावेळी उपप्राचार्य पी. डी. घनवट यांचीही उपस्थिती होती.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थितीत विद्यार्थीनींना मार्गदर्शन करताना जागतिक महिला दिन का साजरा केला जातो. समाजामध्ये स्त्रियांना असणारे अनन्य साधारण असे महत्त्व. तसेच स्त्रियांचे आरोग व आहार, शारीरिक व मानसिक स्वास्थ्य, आदर्श महिलांचे स्त्रियांच्या जीवनातील योगदान, शालेय जीवनामध्ये विद्यार्थिनींनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी व त्याचा आपल्या शैक्षणिक जीवनावर कसा परिणाम होतो याविषयीची माहिती विविध उदाहरणे देऊन सांगितली. प्रशालेतील विद्यार्थिनींनी आपले आरोग्य विषयी प्रश्न मान्यवरांना विचारून त्याचे निरसन करून घेतले.
प्राचार्य एस. बी. थोरात यांनी विद्यार्थिनींना समाजातील आदर्श महिलांची उदाहरणे देऊन स्त्रियांचे समाजात असणारे महत्त्व व स्त्री शिक्षणाने स्त्रियांमध्ये घडून आलेला अमुलाग्र बदल तसेच प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो याविषयी आपले मत मांडले व जागतिक महिला दिनाच्या सर्व विद्यार्थिनी व शिक्षिका यांना शुभेच्छा दिल्या. उपप्राचार्य पी. डी. घनवट व माध्यमिक विभागातील ज्येष्ठ शिक्षिका सौ. एस. एम. भागवत यांनी उपस्थित सर्वांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थिनी मनोगतामध्ये कु.सलोनी जगताप या विद्यार्थिनीने जागतिक महिला दिनानिमित्त आपले विचार भाषणांमधून व्यक्त केले.
प्राध्यापिकात प्रा. धुमाळ व प्रा. आर. एस. सस्ते यांनी काव्यात्मक पद्धतीने जागतिक महिला दिनाचे महत्त्व विद्यार्थिनींना सांगितले. सूत्रसंचालन प्रा. कु. जे. के. फडतरे यांनी केले तर आभार प्रा. आर. एस. सस्ते यांनी मानले.
कार्यक्रमास प्रशालेतील विद्यार्थीनी व शिक्षीका उपस्थित होत्या.