राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने फलटण येथे स्व. यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन

। लोकजागर । फलटण । दि. १३ मार्च २०२५ ।

देशाचे माजी उपपंतप्रधान, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना दि. १२ मार्च रोजी जयंतीनिमित्त फलटण येथे राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने अभिवादन करण्यात आले.

फलटण शहरातील जिंती नाका येथील स्व. यशवंतराव चव्हाण व स्व. सौ. वेणूताई चव्हाण यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने तालुकाध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी – बेडके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष पंकज पवार व राष्ट्रीय काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Spread the love