सिडकोच्या घरांची ऑनलाईन नोंदणी सुरु

। लोकजागर । सातारा । दि. १५ मार्च २०२५ ।

प्रधानमंत्री यांच्या सर्वांसाठी घरे संकल्पनेनुसार सिडको महामंडळामार्फत पंतप्रधान आवास योजनेंतर्गत 67 हजार परवडणाऱ्या घरांचे बांधकाम सुरु आहे. त्यानुसार प्रथम टप्प्यात सिडकोने 25 हजार 723 सदनिकांसाठी महागृहनिर्माण योजनला जाहीर केल्या आहेत. सदर योजनेतील बहुतांश सदनिका ह्या नवी मुंबईतील दळणवळणांचे साधन उपलब्ध असलेल्या ठिकाणी बांधलेली आहेत. या योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरु आहे. तरी इच्छुकांनी नोंदणी करावी, असे आवाहन सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक शान्तनु गोयल यांनी केले आहे.

Spread the love