फलटणमध्ये आज ‘देशी गोवंश आधारित नैसर्गिक शेती’ प्रशिक्षणाचे आयोजन

। लोकजागर । फलटण । दि. १८ मार्च २०२५ ।

महाराष्ट्र गोसेवा आयोग व पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूह यांच्या सहकार्याने फलटण येथे आज ‘देशी गोवंश आधारित नैसर्गिक शेती’ या तालुकास्तरीय प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

सदरचे शिबीर आज मंगळवार, दि. १८ मार्च २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय, फलटण मार्केट यार्ड येथे संपन्न होणार आहे. या शिबीरामध्ये गो आधारित शेती प्रशिक्षक पुनम राऊत व प्रदिप मदने हे तज्ज्ञ व्याख्याते मार्गदर्शन करणार आहेत.

तरी या प्रशिक्षण शिबीराचा लाभ जास्तीत जास्त शेतकरी व पशुपालकांनी घ्यावा, असे आवाहन फलटण पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. एन. बी. फाळके, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय, फलटणचे डॉ. व्ही. टी. पवार यांनी केले आहे. शिबीराबाबत अधिक माहितीसाठी 7447487480 / 8446004580 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

Spread the love