फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर राहुल गांधींची तीव्र प्रतिक्रिया — “ही आत्महत्या नव्हे, संस्थात्मक हत्या आहे”

। लोकजागर । फलटण । दि. 26 ऑक्टोबर 2025 ।

सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील महिला डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येच्या प्रकरणाने देशभरात संताप व्यक्त होत असताना, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
राहुल गांधी यांनी ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वर लिहिले आहे की —

“महाराष्ट्र के सतारा में बलात्कार और उत्पीड़न से तंग आकर डॉ. संपदा मुंडे की आत्महत्या किसी भी सभ्य समाज की अंतरात्मा को झकझोर देने वाली त्रासदी है। … यह आत्महत्या नहीं – संस्थागत हत्या है।”

राहुल गांधी यांनी या प्रकरणात सत्ताधाऱ्यांवर आणि पोलीस यंत्रणेवर भ्रष्टाचाराचे आणि अपराध्यांना संरक्षण देण्याचे आरोप केले आहेत. त्यांनी म्हटले की, “जनतेच्या संरक्षणाची जबाबदारी ज्यांच्यावर होती, त्यांनीच या तरुण डॉक्टरवर अत्याचार केला. BJPशी संबंधित काही प्रभावशाली लोकांनी तिच्यावर भ्रष्टाचारात सहभागी होण्यासाठी दबाव आणल्याची माहिती समोर येत आहे.”

राहुल गांधींच्या या वक्तव्यामुळे प्रकरणाला राजकीय वळण मिळालं असून, राज्यातील विरोधकांनी याप्रकरणी स्वतंत्र चौकशी आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी पुन्हा एकदा केली आहे.

दरम्यान, संपदा मुंडे आत्महत्येच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची (SIT) मागणी होत आहे. नागरिक, डॉक्टर संघटना आणि महिला हक्क चळवळी या घटनेच्या न्यायासाठी एकवटल्या आहेत.

Spread the love