। लोकजागर । फलटण ।
खुंटे (ता.फलटण) येथील कांतीलाल दिनकरराव जगताप (वय 79) यांचे दि.1 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.
खुंटे येथील राहत्या घरापासून निघालेल्या अंत्ययात्रेत सद्गुरु संस्था समुहाचे प्रमुख दिलीपसिंह भोसले, स्वयंसिद्धा संस्था समुहाच्या प्रमुख अॅड.सौ.मधुबाला भोसले, श्री सद्गुरु पतसंस्थेचे चेअरमन तेजसिंह भोसले, महाराजा मल्टीस्टेटचे व्हाईस चेअरमन रणजितसिंह भोसले, खुंटे ग्रामपंचायतीचे सरपंच हणमंत भिसे, खुंटे वि.का.स. सोसायटीचे चेअरमन अविनाश खलाटे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, खुंटे ग्रामस्थ, श्री सद्गुरु व महाराजा संस्था समूहातील कर्मचारी यांच्यासह नातेवाईक उपस्थित होते.
कांतीलाल जगताप यांच्या पश्चात सद्गुरु संस्था व महाराजा संस्था समूहाचे सरव्यवस्थापक संदीप जगताप यांच्यासह दोन विवाहीत मुली, सुन, नातवंडे असा परिवार आहे.