जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांबवे येथे ‘प्रवेशोत्सव’ उत्साहात

। लोकजागर । फलटण । दि. 22 जून 2025 ।

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांबवे ता. फलटण येथे नवीन शैक्षणिक वर्ष २०२५/ २६ चा ‘प्रवेशोत्सव’ उत्साहात संपन्न झाला.

याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आबासाहेब शिंदे , उपसरपंच गजानन शिंदे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष मनोज शिंदे तसेच इतर सदस्य, माता, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांचे शाळेच्या प्रवेशद्वारावरच गुलाब पुष्प देऊन टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले . त्यानंतर मुलांना औक्षण करून त्यांची ओळख करून घेण्यात आली. मोफत पाठ्यपुस्तक वितरण, गणवेश वाटप यांसारखे कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. नवीन शैक्षणिक वर्षात मुले, पालक, ग्रामस्थ सर्वच उत्साही दिसत होते.

शाळेच्या नवनिर्वाचित मुख्याध्यापिका श्रीमती चांगण मॅडम यांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाच्या नियोजन कुलकर्णी मॅडम यांनी केले तर सूत्र संचालन मणेर सर यांनी केले.

Spread the love