फलटण तालुक्यातील काँग्रेस कार्यकत्यांना बळ देणार : रणजितसिंह देशमुख

। लोकजागर । फलटण । दि. 03 जुलै 2025 ।

‘‘जिल्हाध्यक्षपदाचा कार्यभार घेतल्यापासून मी सर्व जिल्हाभर दौरे करत आहे. सर्व नवे – जुने काँग्रेसचे कार्यकर्ते एकत्रित आणून काँग्रेसला गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी काँग्रेसच्या सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ आली आहे. यासाठी फलटण तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांना निश्चितपणे बळ देऊ’’, असे आश्वासन राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी दिले.

सातारा जिल्हा काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली फलटण तालुका व शहर काँग्रेस कमिटीची आढावा बैठक फलटण येथे संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस फलटण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी – बेडके, फलटण शहराध्यक्ष पंकज पवार उपस्थित होते.

यावेळी बोलताना महेंद्र सूर्यवंशी – बेडके यांनी, ‘‘तालुक्यामध्ये काँग्रेस आगामी निवडणुकांमध्ये सर्व जागा लढवणार आहे’’, असे सांगून फलटण तालुक्यामध्ये सर्वसामान्य जनतेसाठी काँग्रेसच्यावतीने चालू असलेल्या कामांसाठी शासकीयस्तरावर केलेली मागणी व त्या संदर्भात होत असलेला पाठपुरावा याची माहिती दिली.

याप्रसंगी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपली मनोगत व्यक्त करताना काँग्रेसची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला.

प्रारंभी जिल्हा कमिटीचे अध्यक्ष झाल्याबद्दल फलटण तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने रणजितसिंह देशमुख यांचा महेंद्र बेडके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बैठकीच्या निमित्ताने हणमंत लोंढे (बरड) व दशरथ जाधव (ढवळ) यांनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला. जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी त्यांचे काँग्रेसमध्ये स्वागत केले.

या आढावा बैठकीस जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस शंकरराव लोखंडे, सुनील नेटके, युवक काँग्रेसचे फलटण शहराध्यक्ष प्रितम जगदाळे, तालुका अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष ताजुद्दीन बागवान, शहराध्यक्ष अल्ताफभाई पठाण, सेवा दलाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र खलाटे, जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस गंगाराम रणदिवे, ओबीसी सेलचे शहराध्यक्ष विकास ननवरे तसेच काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मनोहर गायकवाड, बाल मुकुंद भट्टड, अमरसिंह बेडके,निळकंठ निंबाळकर, आर. पी. भोसले, अच्युत माने, सोहराब खान, अभिजीत जगताप, हरीश बेडके, अमित फाळके, चैतन्य पवार, श्री. मिटकरी, अजय बेडके, दिलीप आवारे, यजुवेंद्र घोरपडे, अतुल कोकणे, भारत अहीवळे, अजय इंगळे, अभिलाष शिंदे, सुधीर शिंदे, धनंजय गोरे, प्रवीण अडसूळ, संतोष बोबडे, संतोष बाचल उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहराध्यक्ष पंकज पवार यांनी केले व शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रीतम जगदाळे यांनी आभार मानले.

Spread the love