रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून हिंगणगावमध्ये बांधकाम कामगारांसाठी नोंदणी शिबिर संपन्न

सेफ्टी आणि मेडिकल किटचे होणार वाटप; १५० हून अधिक कामगारांनी घेतला लाभ.

। लोकजागर । हिंगणगाव । ६ मे २०२६ ।

भारतीय जनता पार्टीच्या ‘सेवा आणि समर्पण’ या तत्त्वानुसार, हिंगणगाव येथील महादेव मंदिर परिसरात बांधकाम कामगारांसाठी मोफत सेफ्टी किट आणि मेडिकल किट नोंदणी शिबिर उत्साहात पार पडले. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचा गावातील सुमारे १५० कष्टकरी बांधवांनी लाभ घेतला असल्याची माहिती देण्यात आली.

नेत्यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन: हे शिबिर यशस्वी करण्यासाठी युवा नेते अमरसिंह नाईक निंबाळकर आणि फलटण पंचायत समितीचे सदस्य धनंजय साळुंखे पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच, जिल्हा परिषद सदस्या सौ. किरणताई नलवडे आणि पंचायत समिती सदस्या सीमा सुरेश भोईटे यांनीही या उपक्रमासाठी मोलाचे योगदान दिले.

कार्यकर्त्यांचा सिंहाचा वाटा: हा कॅम्प यशस्वीरीत्या पार पाडण्यामागे कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा मोठा वाटा होता. यामध्ये गणपत भंडलकर, सुहास काटकर, शेखर विठ्ठल भोईटे, संग्राम भास्कर भोईटे, आणि कुणाल अतुल शिंदे आणि सहकार्‍यांनी विशेष परिश्रम घेतले.

नोंदणी प्रक्रियेनंतर पात्र बांधकाम कामगारांना लवकरच या किटचे वाटप केले जाणार असून, या उपक्रमामुळे हिंगणगावमधील कामगार वर्गात आनंदाचे वातावरण आहे.

Spread the love