डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचा पुढाकार; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर मातंग समाजाची जोरदार मागणी.
। लोकजागर वृत्त । फलटण । ५ सप्टेंबर २०२६ ।
सर्वोच्च न्यायालयाच्या सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाने अनुसूचित जातींच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्यास घटनात्मक मान्यता देत, संबंधित राज्यांना त्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार असल्याचे स्पष्ट केले आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अनुसूचित जाती आरक्षणाचे वर्गीकरण लागू करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्रभर मातंग समाजासह विविध घटकांकडून होत आहे.
याच पार्श्वभूमीवर डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त फलटण येथे ‘आरक्षण वर्गीकरण सामाजिक न्याय परिषद’ आयोजित करण्यात आली आहे. ही परिषद आज शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता, फलटण एसटी स्टँडनजीक, रिंग रोड, हॉटेल मधुदीप समोरील रॉयल क्राउनच्या बँक्वेट हॉलमध्ये होणार आहे.
