| लोकजागर | रत्नागिरी (प्रतिनिधी) | १९ नोव्हेंबर २०२६ |
रत्नागिरी जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, जेष्ठ पत्रकार वसंत विष्णू उर्फ राजाभाऊ लिमये (वय ९०) यांचे निधन झाले असून, त्यांच्या जाण्याने कोकणच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आज सायंकाळी ७.०० वाजता रत्नागिरीतील टिळक आळी येथील त्यांच्या निवास्थानावरून अंत्ययात्रा निघणार आहे.
राजाभाऊ लिमये यांना महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी, फलटण या संस्थेच्या कार्याविषयी विशेष आस्था होती. मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे पोंभुर्ले, जि. सिंधुदुर्ग येथे संस्थेने उभारलेल्या स्मारक कार्यामध्ये त्यांचे सक्रीय योगदान सुरु होते.
कारकिर्दीचा थोडक्यात मागोवा:
- राजकीय प्रवास: २१ जुलै १९३६ रोजी जन्मलेले लिमये हे यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार यांचे विश्वासू सहकारी होते. त्यांनी १९९२ ते १९९७ दरम्यान रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवले.
- कृषी व सहकार: केंद्रीय नारळ विकास मंडळाचे पदाधिकारी म्हणून त्यांनी कोकणातील शेतकरी आणि नारळ बागायतीसाठी उल्लेखनीय काम केले. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक पदही त्यांनी सांभाळले.
- अजातशत्रू व्यक्तिमत्त्व: अभ्यासू पत्रकार, शिक्षणप्रेमी आणि पक्षीय भेदाफरकालीकडे जाऊन सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवणारे नेते म्हणून ते परिचित होते.
त्यांच्या निधनाबद्दल सर्वच स्तरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.
