पुण्यात रंगणार ‘संतांचे संगती एकतारी भजनी महोत्सव’; श्री माणकेश्वर एकतारी भजन मंडळ फलटणतर्फे आगळावेगळा धार्मिक सोहळा

फलटण, पुणे, जेजुरी, आळंदी व भोसरी येथील नामवंत कलाकार लावणार हजेरी.

। लोकजागर वृत्त । फलटण । २३ ऑक्टोबर २०२६ ।

श्री माणकेश्वर एकतारी भजन मंडळ फलटण यांच्यावतीने वारकरी संप्रदाय व आध्यात्मिक प्रेमींसाठी एका भव्य ‘संतांचे संगती एकतारी भजनी महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले आहे. हा भक्तिमय सोहळा बुधवार, दिनांक २८ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत पुणे येथील टिळक रोडवरील टिळक स्मारक मंदिर येथे संपन्न होणार आहे. या महोत्सवात फलटण, पुणे, जेजुरी, आळंदी आणि भोसरी येथील नामवंत गायक, वादक व भजनकरी कलाकार मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या सुरेल एकतारी भजनाने वातावरण भक्तीमय करणार आहेत.

या अध्यात्मिक व सांस्कृतिक महोत्सवास प्रमुख उपस्थिती म्हणून माणिक दादा चव्हाण, कुमार भाऊ खडके, महेंद्र सर (भोसरी), अतुल निकम (मेजर – बजरंग दल पुणे व श्री मुक्तेश्वर महादेव पुणे), बापूसाहेब कुराडे, संभाजीराव दांगट (पाटील) तसेच अनेक नामवंत उपस्थित राहणार आहेत. वारकरी संस्कृती आणि एकतारी भजनाचा वारसा जपणाऱ्या या आगळ्यावेगळ्या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री माणकेश्वर एकतारी भजन मंडळ फलटणच्या वतीने करण्यात आले आहे.

Spread the love