|लोकजागर |विशेष लेख |
आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सण उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. सण, उत्सव,व व्रते यांना शास्त्रीय व अध्यात्मिक कारणे आहेत .पण आजकाल मात्र नवीन पिढी सणांचे महत्त्व विसरत चाललेली आहे. या विज्ञानाच्या युगात हजारो वर्षापासून चालत आलेल्या सणांना ,रुढींना अंधश्रद्धा मानली जात आहे.
तसे पाहिले तर विज्ञानही गरजेचे आहे. आणि अध्यात्म ही तितकेच महत्त्वाचे आहे. वटपौर्णिमा कथा तर सर्वश्रुत आहेच. सावित्रीच्या पातीव्रत्याचे प्रतिक म्हणून हे व्रत केले जाते.भरत खंडात प्रसिद्ध असलेल्या पतिव्रतांपैकी सावित्री ही आदर्श मानलेली आहे.
खरे तर पर्यावरणाच्या दृष्टीने वडाचे अतिशय महत्त्व आहे. त्याच्याविषयी पूजेच्या निमित्ताने कृतज्ञता व्यक्त केली जाते. निसर्गतः दीर्घायुषी असलेले वृक्ष जोपासले जावेत या हेतूने वड, पिंपळ अशा वृक्षांची पूजा करण्याची कल्पना फक्त आपल्या भारतीय संस्कृतीमध्येच आहे. परंतु या धार्मिक वृताला आताची पिढी विडंबन करताना पाहावयास मिळत आहे. एका शहरातील उपनगरात काही वर्षापासून वटपौर्णिमेला स्त्रिया व पुरुष एकत्र येऊन वटवृक्षाला प्रदक्षिणा घालतात .हे विडंबन धर्मशिक्षण नसल्यामुळेच केले जात आहे.या पवित्र ‘वटपौर्णिमा’ व्रताचे विडंबन हिंदूच्या कडूनच केले जात आहे. हिंदूच हिंदूंच्या सणांचे विडंबन करतात. ही किती खेदाची गोष्ट आहे. वटपौर्णिमा व्रताच्या मागील धर्मशास्त्र जाणून घ्या.या पवित्र सणाचे विडंबन करू नका.
