उपाध्यक्षपदी संजय ( काका ) शिंदे; २०२६-२७ च्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची निवड
। लोकजागर वृत्त । फलटण । २५ ऑगस्ट २०२६ ।
फलटण मधील मानाचा इच्छापूर्ती गणपती असलेल्या रविवार पेठ तालीम गणेशोत्सव मंडळ २०२६-२७ च्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची निवड मंडळाच्या वतीने अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. या नवनिर्वाचित कार्यकारी मंडळामध्ये अध्यक्षपदी रविंद्र (नाना) दत्तात्रय जंगम आणि उपाध्यक्षपदी संजय साहेबराव शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. खजिनदार म्हणून गणेश बबनराव महामुलकर तर उपखजिनदार म्हणून अनिल साहेबराव भापकर जबाबदारी सांभाळतील.
मंडळाच्या कार्याध्यक्षपदी सुनिल (तात्या) पांडुरंग कदम, सचिन विजय कदम (पाटील), अजय महादेव वाघ आणि सचिन गजानन तारळकर यांची निवड झाली आहे. सेक्रेटरी पदाची धुरा भानुदास चंद्रकांत टाळकुटे व सिद्धार्थ (बापू) साहेबराव काकडे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. तसेच व्यवस्थापक म्हणून जावेद शेरखान कोतवाल, विलास भगवान जाधव आणि राजेंद्र दगडू गजफोडे काम पाहणार आहेत.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या या निवडीबद्दल सर्व गणेशभक्तांकडून व फलटणकरांमधून त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.
