| लोकजागर | फलटण | दि. २६ जुलै २०२५ |
खुडूस ता. माळशिरस येथील सतीश कुलाळ यांची राष्ट्रवादी कॉग्रेस (अजितदादा पवार गट ) पक्षाच्या ओबीसी सेल प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

या निवडीबद्दल त्यांचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अभिनंदन केले.
कुलाळ यांनी यापूर्वी ओबीसी चळवळीत संपूर्ण राज्यभरात सक्रिय काम केले आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांच्या नेतृत्वामध्ये चळवळीत तयार झालेल्या प्रा. सतीश कुलाळ यांची धडाडीचे कार्यकर्ते व स्पष्ट वक्ते म्हणून ओळख आहे.

संपूर्ण महाराष्ट्रभर मेंढपाळांचे, धनगर समाजाचे, तसेच ओबीसी, एस.सी., एस.टी., अल्पसंख्याक वर्गासह वंचित, उपेक्षित शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती रोखठोक भूमिका मांडणारे सतीश कुताळ यांनी आपल्या कामातून संपूर्ण महाराष्ट्रभर तरुण युवकांचे जाळे तयार केले आहे.
या सर्व कामांची पोचपावती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांची ओबीसी विभाग प्रदेश उपाध्यक्षपदी निवड केली आहे.
