सदगुरु शिक्षण संस्थेत राखी बनविणे कार्यशाळा उत्साहात; विद्यार्थ्यांनी साकारल्या आकर्षक राख्या

शिवम प्रतिष्ठान घारेवाडी (शाखा फलटण) चा उपक्रम; विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणि सर्जनशीलतेला मिळाला वाव.

। लोकजागर वृत्त । कोळकी । २२ ऑगस्ट २०२६ ।

शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व सर्जनशीलतेला वाव मिळावा, तसेच रक्षाबंधनाचे महत्त्व समजावे या उद्देशाने शिवम प्रतिष्ठान घारेवाडी, शाखा फलटणच्या वतीने सदगुरु शिक्षण संस्थेत राखी बनविणे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी विविध रंगांचे धागे, मणी, मोती, कागद व इतर सजावटीच्या साहित्याचा वापर करून अत्यंत आकर्षक व सुंदर राख्या तयार केल्या.

विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आपल्या कल्पकतेतून विविध प्रकारच्या राख्या साकारल्या. या वेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना राखी तयार करण्याच्या विविध पद्धती समजावून सांगत मार्गदर्शन केले. तसेच तयार करण्यात आलेल्या राख्यांचे आकर्षक प्रदर्शनही भरविण्यात आले होते.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, कलाकौशल्य, स्वावलंबन व बंधुभावाची भावना विकसित होण्यास मदत झाली. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी उपशिक्षिका निशुता गोरे, वनिता वाघ, शोभा माळी आणि प्राजक्ता सोनवणे यांनी विशेष प्रयत्न केले. सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक, शिक्षक व पालकांनी कौतुक केले.

Spread the love