शिंदेवाडीत रंगला विद्यार्थ्यांचा अप्रतिम कलाविष्कार.
। लोकजागर वृत्त । फलटण । १९ सप्टेंबर २०२६ ।
सुभाषराव शिंदे (भाऊ) यांच्या जयंतीनिमित्त राजा शिवछत्रपती युवक संघ फलटण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली भव्य चित्रकला स्पर्धा १९ सप्टेंबर २०२६ रोजी अत्यंत उत्साहात पार पडली. शनिवार असल्याने चिमुकल्यांसह शालेय विद्यार्थ्यांचा या स्पर्धेला उदंड प्रतिसाद लाभला. शिंदेवाडी येथील जिल्हा परिषद शाळा (शरद प्रतिभा हायस्कूल शेजारी) येथे सकाळी ९:०० ते ११:०० या वेळेत ही स्पर्धा घेण्यात आली. पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी विविध चार गटांमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेतील इयत्ता पहिली ते दुसरीच्या पहिल्या गटात श्रेयश योगेश यादव याने प्रथम, स्वरा चंद्रकांत खलाटे हिने द्वितीय, शिवांजली हेमंत माने (पाटणेवाडी) हिने तृतीय, तनवी दत्तात्रय माने हिने चतुर्थ तर शिर्वश दीपक बर्गे (पाटणेवाडी) याने पाचवा क्रमांक पटकावला. इयत्ता तिसरी ते चौथीच्या दुसऱ्या गटात अंकिता विकास पवार (पाटणेवाडी) हिने प्रथम, जानवी दत्तात्रय माने हिने द्वितीय, सई दीपक कापसे (पाटणेवाडी) हिने तृतीय, अनुज भुजंग काकडे याने चतुर्थ तर शाहूराज अमोल पिसाळ (पाटणेवाडी) याने पाचवा क्रमांक मिळवला.
इयत्ता पाचवी ते सातवीच्या तिसऱ्या गटात अनुश्री पांडुरंग यादव हिने प्रथम, नैतिक दत्तात्रय चोरामले याने द्वितीय, दिशा बाबुराव यादव हिने तृतीय, राजवर्धन सचिन भगत याने चतुर्थ आणि प्रांजल सोमनाथ माने हिने पाचवा क्रमांक पटकावला. इयत्ता आठवी ते दहावीच्या चौथ्या मोठ्या गटात कल्याणी रामनाथ नामदास हिने प्रथम, सृष्टी दत्तात्रय चोरमले हिने द्वितीय, जानवी प्रशांत मोहिते हिने तृतीय, श्रावणी राजेंद्र खराडे हिने चतुर्थ आणि गायत्री प्रशांत मोहिते हिने पाचवा क्रमांक मिळवला. या विद्यार्थ्यांनी ‘निसर्ग चित्र’, ‘स्वातंत्र्य दिन’ आणि आधुनिक काळाशी सुसंगत अशा ‘एआय तंत्रज्ञान’ या आव्हानात्मक विषयांवर उत्कृष्ट कलाकृती सादर केल्या.
याप्रसंगी फलटण पंचायत समितीचे माजी उपसभापती चेतनभैया शिंदे, रयत शिक्षण संस्थेच्या डायरेक्टर प्रतिभा शिंदे, माजी सरपंच शेगर, शरद प्रतिभा हायस्कूलचे मुख्याध्यापक खोमणे, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका खलाटे, निकाळजे, जगताप, नाळे, रणवरे, सोनवलकर, पाटणेवाडी शाळेचे सर्व शिक्षक, अक्काताई नलवडे, राहुल शिंदे व रोहित शिंदे उपस्थित होते. या स्पर्धेचे यशस्वी आयोजन राजा शिवछत्रपती युवक संघाचे अध्यक्ष सचिन भगत, संयोजक रणजीत शिंदे, स्वागताध्यक्ष प्रशांत धनवडे आणि निमंत्रक अध्यक्ष पोपट बर्गे यांनी केले.
