गजानन चौक ते दगडी पुलाचा रस्ता अखेर मार्गी; स्वातंत्र्यदिनी भूमिपूजन सोहळा

नगरसेविका सिद्धाली अनुप शहा यांची माहिती; माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती.

। लोकजागर वृत्त । फलटण । १४ ऑगस्ट २०२६ ।

फलटण शहरातील गजानन चौक ते दगडी पूल या रस्त्याच्या कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती फलटण नगरपरिषदेच्या नगरसेविका सिद्धाली अनुप शहा यांनी दिली आहे. उद्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून या बहुप्रतिक्षित रस्त्याच्या कामाचा प्रत्यक्ष शुभारंभ होणार आहे.

उद्या, स्वातंत्र्य दिनी सकाळी ठीक ११:०० वाजता गजानन चौक येथे या रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. या विकासकामामुळे परिसरातील नागरिकांची व वाहनधारकांची मोठी सोय होणार आहे.

या कार्यक्रमासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, फलटणचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या जिजामाला नाईक निंबाळकर, युवा नेत्या मनीषाताई नाईक निंबाळकर, स्वराज नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अमरसिंह नाईक निंबाळकर आणि फलटण पंचायत समितीच्या सभापती शिवांजली भोसले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच, या कार्यक्रमाला फलटण नगरपरिषदेच्या सर्व नगरसेवकांचीही विशेष उपस्थिती राहणार आहे.

प्रभाग क्रमांक ८ मधील नागरिकांसह संपूर्ण फलटण शहरातील सर्व नागरिकांनी या भूमिपूजन कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे जाहीर आवाहन नगरसेविका सिद्धाली अनुप शहा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Spread the love