सरत्या श्रावणी शनिवारी गोपालकाल्यानिमित्त विविध पठण सोहळ्याचे आयोजन.
। लोकजागर वृत्त । फलटण । ०५ सप्टेंबर २०२५ ।
अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था, नाशिक, केंद्र – फलटण यांच्या वतीने शनिवार २९ ऑगस्ट २०२५ रोजी श्रीराम मंदिर, फलटण येथे मारुती स्तोत्र पठण व रामरक्षा पठण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमास भाविकांची मोठी उपस्थिती होती. पुष्पाताई कदम, नातू, वृंदा सहस्त्रबुद्धे, स्नेहल तगारे, नियोजिता केंजळे, रेवती गोसावी यांनी कार्यक्रमाचे व्यासपीठ चालवले आणि उपस्थित भाविकांकडून स्वरबद्ध आवाजात मारुती स्तोत्र आणि रामरक्षा पठण करून घेतले. या कार्यक्रमामुळे श्रीराम मंदिरामध्ये एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. सदर कार्यक्रमामध्ये रामनाम जप होऊन शेवटी सुभाष देशपांडे व त्यांच्या पत्नीच्या हस्ते आरती झाली व प्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फलटण केंद्राच्या सर्व कार्यकारिणी सदस्यांनी – निखिल केसकर, विभूते, विष्णुप्रद, सचिन कुलकर्णी, अतुल पेंढारकर, किरण गोगटे, नितीन लटकर, श्रुती इनामदार, जयंत सहस्त्रबुद्धे, मुकुंदराव जोशी, अमेय चिटणीस, मंगेश पेटकर, श्रीपाद चिटणीस यांनी भरपूर परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमासाठी नाईक निंबाळकर देवस्थान ट्रस्टने मोलाचे सहकार्य केले.
आज शनिवार ५ सप्टेंबर २०२६ रोजी सरता श्रावणी शनिवार असून त्याच दिवशी गोपालकाल्यानिमित्त मारुती स्तोत्र आणि रामरक्षा पठणाबरोबरच विष्णू सहस्रनाम आणि गीता १५ वा अध्याय पठणाचा कार्यक्रम होणार आहे. विष्णू सहस्त्रनाम पठण करताना मूर्तीला सहस्त्र तुलसी अर्जन होणार असून त्यानंतर आरती आणि प्रसाद गोपाळकाल्याचे वाटप होईल. फलटणमधील सर्व बंधू-भगिनींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन फलटण केंद्राचे प्रमुख चंद्रशेखर दाणी यांनी केले असून सदरचा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
