नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा होणार यथोचित सन्मान; पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली माहिती.
। लोकजागर । सातारा । १८ एप्रिल २०२६ ।
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते सातारा जिल्ह्यात नवनिर्वाचित नगरपालिका पदाधिकारी, नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे पदाधिकारी आणि सदस्यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सातारा जिल्हा शिवसेनेच्या वतीने आयोजित हा सोहळा सोमवार, दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५:३० वाजता साताऱ्यातील ऐतिहासिक गांधी मैदान येथे संपन्न होणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
या सत्कार सोहळ्यासोबतच याच ठिकाणी एका भव्य जाहीर सभेचेही आयोजन करण्यात आले आहे. या सभेच्या माध्यमातून मुख्यमंत्री जिल्ह्यातील शिवसैनिकांना आणि नागरिकांना मार्गदर्शन करणार आहेत.
दरम्यान सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडीवेळी घडलेल्या राजकीय नाट्यावर एकनाथ शिंदे काय बोलणार? याकडे जिल्हा वासीयांचे लक्ष असणार आहे.
