| लोकजागर | विशेष लेख |
भारताचा स्वातंत्र्य दिन साऱ्या देशभर उत्साहाने साजरा केला जातो .हे स्वातंत्र्य सहज आपल्याला मिळालेले नाही. स्वातंत्र्यासाठी हजारो स्वातंत्र्य सैनिकांनी हा तिरंगा ध्वज छातीशी कवटाळून त्याचा मान राखला.तिरंगा खाली पडू दिला नाही. स्वातंत्र्य चळवळीत हा ध्वज म्हणजे राष्ट्राच्या अस्मितेची आणि स्वातंत्र्याची प्रेरणा होती. तिरंगा ध्वज हाती घेणे. हा सुद्धा ब्रिटिशांच्या काळी गुन्हा होता. वंदे मातरम या मंत्राचा जागर करीत अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी हसत हसत फाशीचा दोर आपल्या गळ्याभोवती अडकवून घेतले होते. तोच हा तिरंगा ध्वज आपल्या राष्ट्राचा पंचप्राण आहे. त्या ध्वजाचा स्वातंत्र्यदिनी मान ठेवायलाच हवा.तिरंगी ध्वजाच्या रंगाचे कपडे, टोपी,टॅटू हे सारे ध्वजाचा अवमान करणारे आहेत. त्याग, क्रांती ,शांती आणि समृद्धी या मूल्यांची शिकवण देणाऱ्या राष्ट्रध्वजाचा मान सर्वांनी ठेवावा. पताका किंवा शोभेसाठी त्याचा वापर होऊ नये. तो जमिनीवर पडणार नाही. फाटणार नाही. याची दक्षता घ्यावी ते राष्ट्रध्वज उंच ठिकाणी फडकवावा त्याचा पताका किंवा शोभेसाठी त्याचा वापर करू नये.उत्साहा पोटी गैर वापर करून ही मुल्यच आपण पायदळी तुडवत आहोत. हे लक्षात घेऊन राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही. याची काळजी घेऊ या आणि त्याचा मान राखू या.
