फलटण शहरातील प्रमुख रस्त्यांच्या दुभाजकांमध्ये लावणार शोभेची झाडे; नगरपरिषदेचे संस्था व नागरिकांना जाहीर आवाहन

मुख्याधिकारी निखिल जाधव यांची माहिती.

। लोकजागर वृत्त । फलटण । ११ सप्टेंबर २०२६ ।

फलटण शहरातील विविध संस्था व नागरिकांना फलटण नगरपरिषदेच्या वतीने जाहीर आवाहन करण्यात आले आहे. शहरातील पिरॅमिड चौक ते गिरवी नाका आणि डी.एड. कॉलेज चौक ते पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चौक ते नाना पाटील चौक या रस्त्यांमधील दुभाजकांमध्ये (डिवायडर) शोभेची झाडे लावायची आहेत.

त्यानुसार शहरातील विविध संस्था जर नगरपरिषदेस शोभेची झाडे उपलब्ध करून देण्यास तयार असतील, तर त्यांनी तसे नगरपरिषदेस कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे. अशा प्रकारे सहकार्य करणाऱ्या संस्थांना योग्य त्या ठिकाणी जाहिरात प्रसिद्धी करण्यासाठी वाव दिला जाईल, अशी माहिती फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी दिली आहे.

Spread the love