फलटणमध्ये भव्य ‘गौरी सजावट’ व ‘बाप्पा रील्स’ स्पर्धेची धूम; महिलांना आकर्षक बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी

रक्षक रयतेचा फाउंडेशन, लायन्स क्लबसह विविध संस्थांचा संयुक्त उपक्रम; १८ सप्टेंबर रोजी रंगणार स्पर्धा, नाव नोंदणीचे आवाहन.

। लोकजागर वृत्त । फलटण । १६ सप्टेंबर २०२६ ।

गणेशोत्सवाचे औचित्य साधून ‘रक्षक रयतेचा महिला सामाजिक फाउंडेशन फलटण’, ‘लायन्स क्लब फलटण’, ‘माळजाई मंदिर उद्यान समिती फलटण’, ‘गगनगिरी ज्वेलर्स’ आणि ‘इंद्राक्षी कलेक्शन फलटण’ यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी १८ सप्टेंबर रोजी भव्य ‘गौरी सजावट स्पर्धा’ आणि ‘बाप्पा विथ रील स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील प्रत्येक सहभागी महिलेला प्रमाणपत्र आणि हमखास बक्षीस दिले जाणार असून नाव नोंदणीची अंतिम तारीख १७ सप्टेंबर आहे. महिलांनी या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन उत्सवाचा आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

गौरी सजावट स्पर्धा केवळ फलटण शहर व परिसरासाठी आयोजित करण्यात आली असून गगनगिरी ज्वेलर्सतर्फे प्रथम क्रमांकास फॉर्मिंग नेकलेस, द्वितीय क्रमांकास बाजूबंद, तृतीय क्रमांकास मोती हार, चतुर्थ क्रमांकास आकर्षक देव मूर्ती आणि पाचव्या क्रमांकास गिफ्ट हॅम्पर अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. या स्पर्धेसाठीचे देखावे पौराणिक, ऐतिहासिक, पारंपरिक, समाज प्रबोधनपर किंवा इको-फ्रेंडली असावेत, तसेच परीक्षकांकडून घरी येऊन परीक्षण केले जाणार आहे.

दुसऱ्या बाजूला बाप्पा विथ रील स्पर्धा संपूर्ण जिल्ह्यासाठी खुली असून गगनगिरी ज्वेलर्सतर्फे प्रथम क्रमांकास फॉर्मिंग नेकलेस, द्वितीय क्रमांकास पैठणी, तृतीय क्रमांकास देव मूर्ती, चतुर्थ क्रमांकास आकर्षक गिफ्ट हॅम्पर आणि पाचव्या क्रमांकास भेटवस्तू अशी बक्षिसे दिली जाणार आहेत. या स्पर्धेसाठीचा व्हिडिओ ३० ते ६० सेकंदांचा एचडी मोडमध्ये असावा तसेच तो भक्तिभाव, धार्मिक किंवा समाज प्रबोधनपर विषयांवर आधारित असणे आवश्यक आहे. या स्पर्धेत कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय निर्मित व्हिडिओ स्वीकारले जाणार नाहीत.

या दोन्ही स्पर्धांसाठी प्रत्येकी स्वतंत्र १५० रुपये प्रवेश फी आकारली जाणार आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी असिफा शिकलगार ८०१०२३९०६२, नंदा बोराटे ९७६६०००३२०, रुपाली कचरे ९२२६७२०८८१, प्रिया सस्ते ९२८४२७४९१३, नीता दोशी ९४२०९९९९१७, मनीषा घडिया ७०२०४६७६८२, सुवर्णा शिंदे ७४९८६१८१८३, उज्वला गोरे ८४८४०३३१४२ आणि अनुराधा रणवरे ८६६८३३६३१३ यांच्याशी संपर्क साधावा.

Spread the love