एस.आय.आर. फॉर्म न मिळालेल्या नागरिकांनी संपर्क साधावा; नगरसेविका सिद्धाली शहा यांचे आवाहन

। लोकजागर वृत्त । फलटण । २२ जुलै २०२६ ।

ज्या नागरिकांना अद्याप एस.आय.आर. चे अर्ज मिळालेले नाहीत, अशा नागरिकांनी आपल्या मतदान ओळखपत्राची छायांकित प्रत (झेरॉक्स) आणि त्यावर आपला भ्रमणध्वनी (मोबाईल) क्रमांक लिहून संपर्क कार्यालयामध्ये जमा करावी, असे आवाहन फलटण नगर परिषदेच्या नगरसेविका कु. सिद्धाली अनुप शहा यांनी फलटणकर नागरिकांना केले आहे. नागरिकांनी जमा केलेल्या कागदपत्रांच्या आधारे संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बी.एल.ओ.) यांच्याशी थेट संपर्क साधून सर्वांना तात्काळ अर्ज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

नागरिकांना आवश्यक असणारे अर्ज सुलभतेने मिळावेत आणि प्रशासकीय प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये यासाठी हे विशेष सहकार्य केंद्र सुरू करण्यात आले आहे. शहरातील ज्या नागरिकांना अद्याप हे फॉर्म मिळालेले नाहीत त्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा आणि आपली कागदपत्रे लवकरात लवकर संपर्क कार्यालयात जमा करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Spread the love