‘प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समिती’ स्थापना व कार्यक्रमांच्या रूपरेषेवर होणार चर्चा; उपस्थित राहण्याचे आवाहन.
। लोकजागर वृत्त । फलटण । ६ ऑगस्ट २०२६ ।
सातारा जिल्ह्याचे सुपुत्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू व सुप्रसिद्ध वक्ते व ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त प्राचार्यांच्या कार्याबद्दलची कृतज्ञता म्हणून फलटण येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करावयाचे आहे. या अनुषंगाने ‘प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समिती’ची स्थापना करणे, नियोजित कार्यक्रमाची रूपरेषा व भूमिका ठरविणे या साठी उद्या शुक्रवार, दिनांक ०७/०८/२०२६ रोजी दुपारी १ वाजता महाराजा आयकॉन, डीएड चौक, लक्ष्मीनगर, फलटण येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्याशी आपल्या पैकी अनेकांचा निकटचा स्नेह होता. तरी सर्व स्नेहीजनांनी या जन्मशताब्दी निमित्त आयोजित करावयाच्या कार्यक्रमाच्या या बैठकीस आवर्जून उपस्थित राहून आपल्या या संबंधीच्या कल्पना व सूचना मांडाव्यात, असे आवाहन दिलीपसिंह भोसले, सचिन सूर्यवंशी बेडके, रवींद्र बेडकिहाळ या प्राचार्य शिवाजीराव भोसले जन्मशताब्दी समिती निमंत्रक सदस्यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
