परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला; संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते नवीन एसटी बसचे लोकार्पण !

फलटण आगाराच्या प्रवाशांना मिळणार अधिक सोयीस्कर सेवा.

। लोकजागर वृत्त । फलटण । १२ ऑगस्ट २०२६ ।

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मार्गावरील बस स्थानक पाहणी दौऱ्यादरम्यान फलटण बस स्थानकाला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भेट दिली होती. त्या वेळी संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण बसस्थानकासाठी विशेष एसटी बस उपलब्ध करून देण्याची मागणी मंत्री महोदयांना केली होती. या प्रसंगी मंत्री सरनाईक यांनी ३१ ऑगस्टपूर्वी बस उपलब्ध करून देण्याचा शब्द दिला होता. दिलेला शब्द पूर्ण करत फलटण आगाराला नवीन एसटी बस उपलब्ध करून देण्यात आल्या असून, आज १२ ऑगस्ट २०२६ रोजी फलटण आगार येथे या बसच्या लोका र्पणाचा कार्यक्रम संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला.

शिवसेना पक्षाच्या वतीने दिलेल्या शब्दाला किती महत्त्व दिले जाते, याचे हे उदाहरण असल्याची भावना या वेळी व्यक्त करण्यात आली. दरम्यान, फलटण आगारासाठी आणखी काही बस उपलब्ध होणे बाकी असून, त्या देखील लवकरच उपलब्ध करून देण्याचा शब्द मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. नवीन बस उपलब्ध करून दिल्याबद्दल संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आभार मानले. नवीन बसमुळे प्रवाशांना अधिक चांगली व नियमित एसटी सेवा मिळण्यास मदत होणार आहे.

या वेळी पंचायत समितीचे उपसभापती अमोल सस्ते, जिल्हा परिषद सदस्य वैशाली कांबळे, पंचायत समिती सदस्य राहुल नरुटे, शिवसेना तालुकाप्रमुख पिंटू इवरे, विकास शिंदे, नगरसेवक विकास काकडे, पप्पू शेख, स्मिता शहा, कविता मदने, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शिवलाल गावडे, दीपक गायकवाड, फलटण आगार प्रमुख सोफिया मुल्ला, आगार व्यवस्थापक राहुल वाघमोडे, सुखदेव अहिवळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Spread the love