अशोक जीवराज दोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण; एनसीसी संचलन, प्राविण्यप्राप्त विद्यार्थी व क्रीडा कवायतीने भारावले वातावरण.
। लोकजागर वृत्त । फलटण । १६ ऑगस्ट २०२६ ।
फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटण येथे भारतीय स्वातंत्र्याचा ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुधोजीराजे यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. फलटण एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष अशोक जीवराज दोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले.
ध्वजारोहण ऑर्डर प्रशालेचे क्रीडा शिक्षक तुषार मोहिते यांनी दिली, तर वंदे मातरम, राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत व झेंडा गीत गायन विनिता लोणकर, नेरकर, आर्या साळुंखे व इतर विद्यार्थिनींनी सादर केले. मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे एनसीसी विभाग प्रमुख डी. जे. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एनसीसीच्या कॅडेटनी या वेळी शपथ घेतली व संचलन केले. याचे नेतृत्व CQMS रुद्र तांबे व त्यांचे सहकारी सार्जंट मृणालिनी घोरपडे, ऑल इंडिया कॅम्प मास्टर्स विनर श्रवण चव्हाण यांनी केले.
या प्रसंगी १० वीच्या विद्यार्थ्यांचा व १२ वीच्या कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला:
- इयत्ता १० वी (प्रथम तीन क्रमांक): जानवी लांडगे, सई शिंदे, वेदांतिका कणसे पाटील, श्रेया कदम
- इयत्ता १२ वी (कला शाखा): यशराज मदने, अंजली कदम, सई चव्हाण
- इयत्ता १२ वी (वाणिज्य शाखा): अश्विनी नेवसे, प्रणिता कांबळे, पूनम कचरे
- इयत्ता १२ वी (विज्ञान शाखा): सिद्धांत साळुंखे, सई सुर्वे, संस्कृती फरांदे
- इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा: आध्या केदार खिलारे, प्रगती बनकर, स्वरा हरिहर
- एमटीएस परीक्षा (राज्यात ७ वा क्रमांक): सुयश दोशी
- नगरपरिषद निबंध स्पर्धा (उत्तेजनार्थ): स्वरांजली अमोल नाळे
या सर्व विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी इयत्ता आठवीतील विद्यार्थी वीर दोशी याने कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अशोक जीवराज दोशी यांना स्वतः काढलेले महात्मा गांधींचे चित्र भेट दिले.
क्रीडा विभागाचे तुषार मोहिते यांच्या संकल्पनेतून इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांच्या तालावर सामूहिक कवायत व संचलन सादर केले. या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी भारत बोराटे, गणेश पाटील, लोकरे, राजपुरे यांनी सहाय्यक मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावली.
या प्रसंगी फलटण एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे ट्रेझरर हेमंत रानडे, नियामक मंडळाचे सदस्य शिरीषशेठ दोशी, रणजित निंबाळकर, भोजराज नाईक निंबाळकर, संजय भोसले, नितीन गांधी, वसुंधरा नाईक निंबाळकर, बोर्ड ऑफ ट्रस्टीज उषादेवी भोसले, चंद्रकांत पाटील, प्रशासन अधिकारी अरविंद निकम, शाळा तपासणीस दिलीप राजगुडा, सुधीर अहिवळे, माजी सहाय्यक क्रीडा प्रशिक्षक बी. बी. खुरांगे, प्राचार्य वसंत कृष्णा शेडगे, ज्युनिअरचे उपप्राचार्य सोमनाथ माने, माध्यमिकचे उपप्राचार्य अण्णासाहेब ननवरे, पर्यवेक्षक आर. बी. निंबाळकर, विजय पाटील, पूजा पाटील व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजित जमदाडे व संजय गोफणे यांनी केले.
