प्रलंबित तक्रारींच्या निरसनासाठी फलटणमध्ये आज जनता दरबार; महाराजा मंगल कार्यालयात होणार आयोजन!

रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती; आमदार सचिन पाटील आणि नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर राहणार उपस्थित.

। लोकजागर वृत्त । फलटण । ७ सप्टेंबर २०२६ ।

फलटण तालुक्यातील नागरिकांच्या प्रलंबित तक्रारींचे निरसन करण्यासाठी सोमवार, दि. ०७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता महाराजा मंगल कार्यालय येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि आमदार सचिन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या जनता दरबाराला नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचीही उपस्थिती असणार आहे.

जनता दरबारात सर्व शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार असून, नागरिकांच्या प्रलंबित तक्रारींचे निरसन करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. फलटण तालुक्यातील ज्या नागरिकांनी अर्ज केले आहेत, त्यांनी आपल्या अर्जाच्या प्रतीसह सकाळी ११ वाजता महाराजा मंगल कार्यालय येथे उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार सचिन पाटील यांनी केले आहे.

जनता दरबाराला फलटण नगरपरिषदेचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, फलटण पंचायत समितीच्या सभापती शिवांजली भोसले व पंचायत समिती सदस्य उपस्थित राहणार आहेत. तसेच भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व पदाधिकारीही या वेळी उपस्थित राहणार आहेत.

Spread the love