प्रदेश प्रतिनिधी सचिन सूर्यवंशी बेडके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण
। लोकजागर वृत्त । फलटण । २ ऑक्टोबर २०२६ ।
२ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून फलटण तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने गजानन चौक येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी सचिन सूर्यवंशी बेडके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी तालुका अध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी बेडके, शहर अध्यक्ष व नगरसेवक पंकज पवार तसेच सामाजिक कार्यकर्ते अमीर शेख, सिकंदर डांगे, अशोकराव भोसले हे उपस्थित होते. यासोबतच राष्ट्रीय काँग्रेसचे पदाधिकारी मनोहर गायकवाड, ताजुद्दीन बागवान, बालमुकुंद भट्टड, गंगाराम रणदिवे, बालम शेख, लक्ष्मण शिंदे, अल्ताफ पठाण, अजय इंगळे, विकास ननावरे, मंजेखान मेटकरी, नितीन जाधव, धनंजय गोरे, अमोल नलवडे, प्रमोद शहा, पोपट शिंदे, संतोष बाचल, हरून इनामदार, मनमोहन बरसावडे आणि भारत अहिवळे हे उपस्थित होते.
