नगरपरिषदेचे जाहीर आवाहन
। लोकजागर वृत्त । फलटण । १४ ऑक्टोबर २०२६ ।
महाराष्ट्रात अल-निनोच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे महाराष्ट्र शासनाच्या ५ ऑक्टोबर २०२६ च्या शासन निर्णयानुसार पाणी पुरवठ्यामध्ये कपात करण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. यानुसार फलटण शहरातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, येत्या १६ ऑक्टोबर २०२६ पासून फलटण शहरात दैनंदिन पाणी पुरवठ्यामध्ये २० टक्के कपात करण्यात येत आहे.
या भीषण टंचाईच्या काळात पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी शहरातील सर्व स्विमिंग पूल तसेच सर्व प्रकारची वाहने धुण्यासाठी असणारी वॉशिंग सेंटर्स पुढील आदेश होईपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचे कडक आदेश देण्यात आले आहेत. तरी या निर्णयाची सर्व नागरिकांनी नोंद घेऊन फलटण नगरपरिषदेस सहकार्य करावे, असे जाहीर आवाहन फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव आणि पाणी पुरवठा व जलनिस्सारण समितीचे सभापती राहुल निंबाळकर यांनी केले आहे.
