। लोकजागर । फलटण । दि. 10 जून 2025 ।
‘‘बाणगंगा नदीचे रुपडे पालटणारे रणजितसिंह नाईक निंबाळकर हे विकास पुरुष आहेत’’, असे मत फलटण नगरपरिषदेचे माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.

अशोकराव जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, ‘‘फलटण तालुक्यात अतिवृष्टी झाले नंतर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी लगेचच निरा उजवा कालवा अधीक्षक अभियंता यांचेकडून 6 फोकलेन मशीन घेऊन फलटण तालुक्यातील बाणगंगा नदी व ओढे साफ करण्याचे काम हाती घेतले व त्यांचे प्रयत्नातून बाणगंगा नदी पहिल्यांदा स्वच्छ होऊन नदीचे रुपडे पालटले आहे.’’

‘‘या पुढे पाऊस आला तरी नदी काठील घरामध्ये पाणी जाऊ नये या साठी जे प्रयत्न रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले त्या बद्दल त्यांना मलठण व फलटण मधील नदी जवळील शनीनगर, शुक्रवार पेठ, भैरोबा गल्ली, बुधवार पेठ, मंगळवार पेठ येथील नागरिकांनी धन्यवाद दिले आहेत’’, असेही अशोकराव जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकात सांगितले आहे.

