फलटणच्या ग्रामीण राजकारणात पुन्हा ‘महासंग्राम’

। लोकजागर । फलटण । दि. २१ फेब्रुवारी २०२६ ।

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा धुरळा शांत होत नाही तोच, फलटण तालुक्याच्या ग्रामीण राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय ठिणगी पडली आहे. तालुक्यातील एकूण १३१ ग्रामपंचायतींपैकी तब्बल १०२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल येत्या काही दिवसांत वाजणार आहे. शासनाकडून ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेचे अधिकृत आदेश प्रशासनाला प्राप्त झाले असून, ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. यामुळे तालुक्यात पुन्हा एकदा माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा ‘खासदार गट’ आणि आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा ‘राजे गट’ यांच्यात सत्तेचा अटीतटीचा आणि थेट सामना पाहायला मिळणार आहे.

या निवडणुकीत तालुक्यातील बहुतांश मोठ्या आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या गावांचा समावेश आहे. प्रामुख्याने जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच यापूर्वीच मुदत संपून प्रशासकराज असलेल्या १०२ गावांचा यात समावेश आहे. ‘थेट सरपंच’ निवडीच्या पद्धतीमुळे या निवडणुकांना विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, गावागावांत आतापासूनच भावकीच्या राजकारणासह राजकीय मोर्चेबांधणीला प्रचंड वेग आला आहे. प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या कोळकी, साखरवाडी, गुणवरे, तरडगाव, आसू आणि होळ यांसारख्या मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये सत्तेची समीकरणे जुळवण्यासाठी दोन्ही गटांनी कंबर कसली आहे.

‘या’ १०२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा आखाडा तापणार (कंसात मुदत समाप्तीची तारीख):

२२ फेब्रुवारी २०२६ रोजी मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती:
साखरवाडी (२२/०२/२०२६), तांबवे (२२/०२/२०२६), कोळकी (२२/०२/२०२६), पिराचीवाडी (२२/०२/२०२६), खुंटे (२२/०२/२०२६), भिलकटी (२२/०२/२०२६), जाधववाडी (फ) (२२/०२/२०२६), अलगुडेवाडी (२२/०२/२०२६), सोनवडी खु. (२२/०२/२०२६), तिरकवाडी (२२/०२/२०२६), सासकल (२२/०२/२०२६), डोंबाळवाडी (२२/०२/२०२६), शेरेशिंदेवाडी (२२/०२/२०२६), सस्तेवाडी (२२/०२/२०२६), घाडगेवाडी (२२/०२/२०२६), कापडगाव (२२/०२/२०२६), निरगुडी (२२/०२/२०२६), रावडी बु. (२२/०२/२०२६), वाघोषी (२२/०२/२०२६), जिती (२२/०२/२०२६), कापशी (२२/०२/२०२६), धुमाळवाडी (२२/०२/२०२६), मुळीकवाडी (२२/०२/२०२६), काशिदवाडी (२२/०२/२०२६), फरांदवाडी (२२/०२/२०२६), घाडगेमळा (२२/०२/२०२६), कुरवली बु. (२२/०२/२०२६), शिंदे नगर (२२/०२/२०२६), ठाकुरकी (२२/०२/२०२६), नांदल (२२/०२/२०२६), सरडे (२२/०२/२०२६), सांगवी (२२/०२/२०२६), राजुरी (२२/०२/२०२६), तावडी (२२/०२/२०२६), जावली (२२/०२/२०२६), खामगाव (२२/०२/२०२६), हिंगणगाव (२२/०२/२०२६), मुंजवडी (२२/०२/२०२६), साठे (२२/०२/२०२६), खराडेवाडी (२२/०२/२०२६).

२३ फेब्रुवारी २०२६ रोजी मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती:
मलवाडी (२३/०२/२०२६), तडवळे (२३/०२/२०२६), विचुर्णी (२३/०२/२०२६), वडगाव (२३/०२/२०२६), निंभळक (२३/०२/२०२६), मिरढे (२३/०२/२०२६), कोरेगाव (२३/०२/२०२६), मुरुम (२३/०२/२०२६), शेरेचीवाडी ढ. (२३/०२/२०२६), भाडळी बु. (२३/०२/२०२६), भाडळी खु. (२३/०२/२०२६), टाकळवाडे (२३/०२/२०२६), ढवळ (२३/०२/२०२६), आंदरूड (२३/०२/२०२६), रावडी खु. (२३/०२/२०२६), आरडगाव (२३/०२/२०२६), शिंदेवाडी (२३/०२/२०२६), नाईकबोमवाडी (२३/०२/२०२६), कांबळेश्वर (२३/०२/२०२६), धुळदेव (२३/०२/२०२६), निंभोरे (२३/०२/२०२६), काळज (२३/०२/२०२६), बीबी (२३/०२/२०२६), हणमंतवाडी (२३/०२/२०२६), बोडकेवाडी (२३/०२/२०२६), होळ (२३/०२/२०२६), सोनगाव (२३/०२/२०२६), वडजल (२३/०२/२०२६), फडतरवाडी (२३/०२/२०२६), आळजापूर (२३/०२/२०२६), राजाळे (२३/०२/२०२६), गुणवरे (२३/०२/२०२६), वाखरी (२३/०२/२०२६), सोनवडी बु. (२३/०२/२०२६), ढवळेवाडी नि. (२३/०२/२०२६), झिरपवाडी (२३/०२/२०२६), पवारवाडी (२३/०२/२०२६), शेरेचीवाडी (हिं) (२३/०२/२०२६), को-हाळे (२३/०२/२०२६), जाधववाडी (ता.) (२३/०२/२०२६).

प्रशासक असलेल्या व मुदत संपलेल्या ग्रामपंचायती:
तरडगाव (१८ मार्च २०२४), खडकी (१९ मार्च २०२४), गोखळी (१९ मार्च २०२४), माळेवाडी (१९ मार्च २०२४), चांभारवाडी (२२ मार्च २०२४), दालवडी (२३ मार्च २०२४), विठ्ठलवाडी (२३ मार्च २०२४), शिंदेमाळ (२४ मार्च २०२४), सासवड (२४ मार्च २०२४), टाकोबाईचीवाडी (२६ मार्च २०२४), ढवळेवाडी आसू (२७ मार्च २०२४), मिरगाव (२७ मार्च २०२४), मि-याचीवाडी (दा.) (२९ मार्च २०२४), आसू (०२ एप्रिल २०२४), खटकेवस्ती (११ मे २०२४), ऊळुंब (०३ डिसेंबर २०२४), माझेरी (०१ जानेवारी २०२५), गोळेवाडी (०३ जानेवारी २०२५), परहर खु. (७ जानेवारी २०२५), जोर पुन. (वाखरी) (१४ फेब्रुवारी २०२५), गोळेगाव पु. (ठाकुरकी) (२३ फेब्रुवारी २०२५), जोर पुन. (कुरवली खु) (२६ फेब्रुवारी २०२५).

Spread the love