। लोकजागर । फलटण । शनिवार, दि. १४ मार्च २०२६ ।
भारतीय पत्रकार संघ, सातारा जिल्ह्याचे उपाध्यक्ष आणि पत्रकार प्रा. विकास शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आज, शनिवार १४ मार्च २०२६ रोजी फलटण शहरात विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या प्रा. विकास शिंदे यांचा वाढदिवस यंदा शालेय विद्यार्थ्यांसोबत साजरा करून सामाजिक बांधिलकी जपली जाणार आहे.
या निमित्ताने आज सकाळी १०.३० वाजता नगरपरिषद शाळा क्रमांक ५ (बाहुली शाळा) आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरपरिषद शाळा क्रमांक २ येथे विद्यार्थ्यांना फळे आणि खाऊ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
प्रा. विकास शिंदे यांचा फलटणच्या पत्रकारितेत प्रदीर्घ अनुभव असून, भारतीय पत्रकार संघाच्या माध्यमातून त्यांनी पत्रकारांच्या संघटनात्मक बांधणीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त फलटण तालुक्यासह जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील व्यक्तींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
