फलटण येथे २६ एप्रिल रोजी बौद्ध वधू-वर महामेळाव्याचे आयोजन

मैत्री सामाजिक सेवा संस्था, निंबळकचा पुढाकार; कोळकी येथील संगम हॉटेलमध्ये होणार अनुरूप स्थळांची ओळख.

। लोकजागर । फलटण । २२ एप्रिल २०२६ ।

शिक्षण आणि सामाजिक बांधिलकीचा वारसा जपत, फलटण येथे मैत्री सामाजिक सेवा संस्था, निंबळक यांच्या वतीने भव्यदिव्य ‘बौद्ध वधू-वर महामेळाव्या’चे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा रविवार, दिनांक २६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता कोळकी येथील संगम हॉटेल (फलटण-दहिवडी रोड) येथे संपन्न होणार आहे. समाजातील सुशिक्षित व विविध क्षेत्रांतील वधू-वरांना एकाच व्यासपीठावर आणून त्यांचे लग्न जमवण्यासाठी सहकार्य करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

या मेळाव्यामध्ये डॉक्टर, वकील, इंजिनीअर, सरकारी व निमसरकारी अधिकारी, शिक्षक, व्यावसायिक तसेच शेतकरी अशा विविध क्षेत्रांतील अनुरूप स्थळे एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. तसेच प्रथम वधू-वर यांच्यासोबतच घटस्फोटीत, विधूर, अपंग व समाजातील इतर क्षेत्रांतील स्थळांची माहितीही येथे मिळणार आहे.

नोंदणीसाठी महत्त्वाच्या सूचना:

  • नोंदणीसाठी वधू/वरांचा एक रंगीत पासपोर्ट साईज फोटो आणि बायोडाटा सोबत आणणे आवश्यक आहे.
  • मेळाव्यात वधू-वरांसोबत इतर दोन पालकांना प्रवेश दिला जाईल आणि त्यांच्या चहा-नाश्त्याची सोय केली जाईल.
  • ज्यांनी नावे नोंदवली आहेत, अशा वधू-वरांनी स्वतः हजर राहणे गरजेचे आहे, अन्यथा प्रवेश नाकारला जाईल.
  • वधू-वरांना एखादे स्थळ पसंत पडल्यास, पुढील सविस्तर चर्चेसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
  • या मेळाव्यासाठी ३०० रुपये प्रवेश शुल्क आकारले जाणार असून, हे शुल्क केवळ मेळावा खर्चासाठी असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.

मैत्री सामाजिक सेवा संस्थेचे सर्व कार्यकर्ते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत. या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी परिसरातील जास्तीत जास्त बौद्ध बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. नाव नोंदणी किंवा अधिक माहितीसाठी इच्छुक 8007368059 / 9960019221 / 9403018048 / 7588424294 या क्रमांकावर आयोजकांशी संपर्क साधू शकता.

Spread the love