होलसेल आणि रिटेल विक्रीसाठी विविध गणेशमूर्ती सज्ज; मूर्तिकार निलेश कारंडे यांचे आवाहन
। लोकजागर वृत्त । फलटण । ५ ऑगस्ट २०२६ ।
यंदा गणरायाचे आगमन अधिक आनंदात आणि खिशाला परवडणाऱ्या दरात करण्यासाठी त्रिमुर्ती कला केंद्र (गणपती कारखाना) सज्ज झाले आहे. येथे होलसेल आणि रिटेल स्वरूपात गणेशमूर्ती विक्रीसाठी उपलब्ध असून, आगामी गणेशोत्सवासाठी मूर्तींचे बुकिंग अधिकृतपणे सुरू करण्यात आले आहे.
गणेशभक्तांना आकर्षक आणि सुबक मूर्ती वाजवी दरात उपलब्ध करून देणे हे या केंद्राचे वैशिष्ट्य आहे. या कारखान्याचा पत्ता सजाई गार्डन, पंचमुखी मंदिर शेजारी, नाळे मळा, जाधववाडी, फलटण असा आहे.
इच्छुक गणेशभक्तांनी आणि व्यापाऱ्यांनी गणेशमूर्ती बुकिंगसाठी मूर्तिकार निलेश कारंडे (सर) यांच्याशी ९९७५४३६२६३ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
