साखरवाडी विद्यालयाचे इयत्ता चौथी, सातवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश; १६ विद्यार्थी ठरले शिष्यवृत्तीधारक!

प्राथमिक व माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी; यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे सर्वत्र कौतुक.

। लोकजागर वृत्त । फलटण । १८ ऑगस्ट २०२६ ।

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता चौथी, सातवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत साखरवाडी शिक्षण संस्थेच्या प्राथमिक व माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. विद्यालयातील एकूण १६ विद्यार्थी जिल्हा शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. यामध्ये इयत्ता चौथीचा १ विद्यार्थी, इयत्ता सातवीचे ११ विद्यार्थी आणि इयत्ता आठवीचे ४ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत.

इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षा (प्राथमिक विभाग): इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी एकूण २२ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी २१ विद्यार्थी पात्र ठरले असून १ विद्यार्थिनी शिष्यवृत्तीधारक ठरली आहे.

  • शिष्यवृत्तीधारक विद्यार्थिनी: प्रतीक्षा कैलास परकाळे. या विद्यार्थिनीला शिष्यवृत्ती समितीच्या कार्यवाह वनिता भागीत तसेच समिती सदस्य पुनम बोंद्रे व रेश्मा कर्वे यांचे मार्गदर्शन लाभले. प्राथमिक विभागाचा शेकडा निकाल ७१ टक्के लागला.

इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षा (माध्यमिक विभाग): माध्यमिक विभागातील शिष्यवृत्ती परीक्षेसाठी एकूण २९ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी १५ विद्यार्थी पात्र ठरले असून ११ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत.

  • शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी: १. मयुरी मनोजकुमार राऊत, २. सर्वेश दत्तात्रय जगताप, ३. स्वरा विनोद कुचेकर, ४. राजवीर मुकुंद फडतरे, ५. वेदराज दिपक नलवडे, ६. ज्ञानेश्वरी नितीनकुमार रणवरे, ७. प्रणव कुलदीप पिसाळ, ८. भार्गवी विशाल रणवरे, ९. दिया प्रकाश चव्हाण, १०. श्रेया राहुल पवार, ११. शौर्य महेश गायकवाड. या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती समितीच्या कार्यवाह विद्या रणवरे, समिती सदस्य मीरा जगताप व मिलिंद फडतरे तसेच इतर शिक्षकवृंदांचे मार्गदर्शन लाभले. माध्यमिक विभागाचा शेकडा निकाल ५१.७२ टक्के लागला.

इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षा (माध्यमिक विभाग): इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी एकूण १४ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी १० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ४ विद्यार्थिनी गुणवत्ता यादीत येऊन शिष्यवृत्तीधारक ठरल्या आहेत.

  • शिष्यवृत्तीधारक विद्यार्थिनी: १. ईश्वरी संजय जगदाळे, २. चैत्राली मंगेश निकाळजे, ३. निसर्गा मिथुन कुऱ्हाडे, ४. दूर्वा महेश खराडे. या विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती समितीच्या कार्यवाह वंदना भोसले तसेच समिती सदस्य एम. बी. लांडगे, एस. डी. वाघमोडे, एम. एच. थोरात व एम. बी. गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.

या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक व शिक्षकवृंदांचे संस्थेचे विश्वस्त समितीचे अध्यक्ष प्रल्हादराव साळुंखे, विक्रम आपटे, राजेंद्र भोसले, संस्थेचे अध्यक्ष धनंजय साळुंखे, संस्था संचालक राजेंद्र शेवाळे व माणिक भोसले यांनी अभिनंदन केले. तसेच संस्थेच्या सचिव व विद्यालयाच्या मुख्याध्यापिका उर्मिला जगदाळे आणि प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक चांगण यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Spread the love