‘आधुनिक आहाराचे दुष्परिणाम’

| लोकजागर | विशेष लेख |

आताच्या काळात बऱ्याच मुलांना पिझ्झा, बर्गर, चिप्स असे पदार्थ आवडतात आणि मुले हे पदार्थ आवडीने खातात. या पदार्थांना फास्ट फूड म्हटले जाते. हे पदार्थ भारतीय नसून पाश्चात्य देशातून आपल्याकडे आलेले फास्ट फूड बाह्यता चवीला चटपटीत लागत असले तरी त्याचे शारीरिक ,बौद्धिक, अध्यात्मिक दुष्परिणाम होतात .

फास्ट फूड हे कृत्रिम आणि प्रक्रिया केलेले शिळे असते. ते सतत खाल्ल्याने शारीरा साठी घातक ठरते .तसेच हे अन्न पचण्यास जड असल्यामुळे त्याच्या सेवनामुळे पचन संस्था बिघडते. विदेशात अशा फास्ट फूड आणि कृत्रिम शीतपेये यांच्या सेवनामुळे मुलांचा लठ्ठपणा वाढत आहे. आणि त्या मुळे चेहरेही विकृत दिसतात. फास्ट फूड मध्ये शरीराचा लठ्ठपणा वाढून माणसाचे आयुष्य घटू शकते. त्याचप्रमाणे चायनीज फूड सुद्धा फास्ट फूड असून त्यात वापरला जाणारा ‘अजिनोमोटो’ हा पदार्थ बुद्धीसाठी हानिकारक आहे.

फास्ट फूड सेवनाने ती खाणाऱ्या व्यक्तीची वृत्ती तामसिक होऊन व्यक्तीमधील राग, चिडचिडेपणा हेकेखोरपणा आदी दुर्गुण वाढत जातात. तसेच शरीरस्वास्थाच्या दृष्टीने अशा निरोपयोगी अन्नपदार्थांच्या सेवनाने होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन. हे अन्न पदार्थ खाण्याचे टाळावे.

श्रीमती वासंती लावंघरे, सातारा.

Spread the love